बिल गेट्स यांना झाला पश्चाताप, नको होते तुमच्या की-बोर्डवरील हे आॅप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 07:09 AM2017-09-23T07:09:38+5:302017-09-23T07:15:36+5:30

जगभरात सर्वाधिक वापरले जाणा-या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचा सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंतांचा बादशाह बिल गेट्स यांना आता एका गोष्टीचा पश्चाताप होतोय...

Bill Gates has regretted this regret, you do not want this key-board option | बिल गेट्स यांना झाला पश्चाताप, नको होते तुमच्या की-बोर्डवरील हे आॅप्शन

बिल गेट्स यांना झाला पश्चाताप, नको होते तुमच्या की-बोर्डवरील हे आॅप्शन

googlenewsNext

न्यू यॉर्क, दि. 23 - जगभरात सर्वाधिक वापरले जाणा-या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंतांचा बादशाह बिल गेट्स यांना आता एका गोष्टीचा पश्चाताप होतोय... ती गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर-लॅपटॉपच्या की-बोर्डवर असलेला एक ऑप्शन आहे. कंट्रोल+अल्ट+डिलीट हे तीन बटन एकत्र दाबल्यानंतर कॉम्प्युटर-लॅपटॉप रिस्टार्ट केले जायचे, आता त्यात टास्क मॅनेजर हा ऑप्शन आला आहे. तोच ऑप्शन आता उतार वयात बिल गेट्सला खटकू लागला आहे. हावर्ड विद्यापीठात ब्लूमबर्गच्या माध्यमातून एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रासाठी अनेक अब्जोपतींसह उद्योगपतींना निमंत्रण देण्यात आलं होतं. श्रीमंतांचा बादशाह असलेले बिल गेट्सही स्वतःच्या फाऊंडेशनचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान डेव्हिड यांनी बिल यांना प्रश्न विचारला, बिल, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, खरं तर हा प्रश्न मी आधीच विचारायला हवा होता. तुम्ही कॉम्प्युटर-लॅपटॉप रिस्टार्ट करण्यासाठी CTRL-Alt-Delete या बटनांचा का वापर केला, त्यावर बिल यांनी डेव्हिड यांच्याकडे खंत व्यक्त केली.

काय म्हणाले बिल गेट्स?

कंट्रोल+अल्ट+डिलीट ही तीन बटने एकाच वेळी दाबून कॉम्प्युटर-लॅपटॉप रिस्टार्ट करण्याऐवजी त्यासाठी एकच बटन की-बोर्डवर द्यायला हवे होते. पण तसे झाले नाही. आयबीएम पीसी जेव्हा 1980 मध्ये पहिल्यांदा बनविण्यात आला तेव्हा या तीन बटनांचा वापर कॉम्प्युटर रिस्टार्ट करण्यासाठी केला गेला. पण त्यासाठी तीन बटने आणि दोन हात एवढा खटाटोप करावा लागतो. मी त्यावेळी सांगितले होते की यासाठी एकच बटन हवे, पण माझे त्यावेळी ऐकले नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा बिल गेट्स यांनी अजब तर्क मांडला होता. तुमच्याकडे दिवसाला फक्त दोन डॉलर्स असतील तर तुम्ही काय कराल? तुमचं जीवनमान कसं सुधाराल?, असा प्रश्न बिल गेट्स यांनी जनतेला विचारला होता. जगभरात किमान शंभर कोटी लोक आज अत्यंत गरिबीत जगतायत. त्या माणसांनी जगायचं कसं?, असं म्हणत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना कोंबड्या पाळणं हा उपाय सुचवला होता. कोंबड्या पाळून गरिबी संपेल का? असं मला काही लोक विचारतीलही, पण ज्यांना काहीच शक्य नाही ते दोन पैसे कमवण्यासाठी एवढं तरी करूच शकतात, असं मतही त्यावेळी बिल गेट्सचं यांनी मांडलं होतं. जर एका शेतक-यानं पाच कोंबड्या पाळल्या तर त्याचं उत्पन्न वर्षभरात वाढू शकतं. त्यातून बायकांनाही काम मिळू शकतं. त्यामुळेच आम्ही ठरवलंय की आफ्रिकेतल्या अतिगरीब लोकांना कोंबड्या द्यायच्या किंवा कोंबड्या पाळायला पैसे द्यायचे. साधारण एक लाख कोंबड्या त्यांनी आफ्रिकेत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सुद्धा त्यांच्या जगभरातून काहींनी टीका केली, तर अनेकांनी कौतुकही केलं. तसेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचास उघडण्यावर बसणा-या लोकांना प्रतिबंध घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचंही बिल गेट्स यांनी कौतुक केलं होतं. 500 व 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयालाही धाडसी संबोधत बिल गेट्स यांनी या निर्णयाचे स्वागत केलं होतं.  

Web Title: Bill Gates has regretted this regret, you do not want this key-board option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.