शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Bill Gates divorce: 27 वर्षे साथ दिली, आता शक्य नाही! अब्जाधीश बिल गेट्स, मेलिंडाकडून घटस्फोटाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 08:10 IST

Bill Gates and Melinda gates announce divorce: बिल गेट्स आणि मेलिंडा यांचे लग्न 1994 मध्ये झाले होते. ते एकमेकांना 1987 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. 27 वर्षे एकत्र राहिलेल्या या जोडप्याकडून नातेसंबंध तोडण्याची घोषणा झाल्याने लोकही हैरान झाले आहेत.

जगातील अत्यंत महागडा घटस्फोट अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस आणि मॅकेन्झी बेजोस यांचा घटस्फोट दोन वर्षांपूर्वी झाला. यानंतर आणखी एक खळबळ उडविणारी बातमी अब्जाधीश आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates)दांम्पत्याकडून येत आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स (Melinda Gates) यांनी २७ वर्षांचे नाते संपविण्याची घोषणा केली आहे. (Billionaire benefactors Bill and Melinda Gates filed for divorce on Monday after 27 years of marriage)

ती सध्या काय करते! अब्जाधीश जेफ बेजोस यांच्या घटस्फोटीत पत्नीने केले एका शिक्षकासोबत लग्न

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट (Bill Gates and Melinda announce divorce) घेत असल्याची घोषणा केली आहे. पुढील काळात आम्ही एकमेकांसोबत चालू शकत नाही, असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी एक वक्तव्य जारी केले आहे. बिल गेट्स यांनी ते ट्विटरवर शेअर केले आहे. मोठी चर्चा आणि आपल्या नात्यावर काम केल्यानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 27 वर्षांमध्ये आम्ही आमच्या तीन मुलांचे संगोपन केले. आम्ही एक फाऊंडेशन देखील बनविले आहे. जे जगभरातील लोकांच्या आरोग्य आणि चांगल्या आयुष्यासाठी काम करते. 

आम्ही या मिशनसाठी पुढेही एकत्र काम करत राहणार आहोत. परंतू आता आम्हाला वाटत आहे की, पुढील काळात पती-पत्नी म्हणून आम्ही एकमेकांना साथ देऊ शकणार नाही. यामुळे आम्ही नवीन आयुष्य सुरु करणार आहोत. यामुळे लोकांकडून आम्हाला आमच्या आयुष्यात हस्तक्षेप न करण्याची अपेक्षा आहे. 

बिल गेट्स आणि मेलिंडा यांचे लग्न 1994 मध्ये झाले होते. ते एकमेकांना 1987 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. 27 वर्षे एकत्र राहिलेल्या या जोडप्याकडून नातेसंबंध तोडण्याची घोषणा झाल्याने लोकही हैरान झाले आहेत. बिल गेट्स यांची ओळख जगातील अब्जाधीश म्हणून आहे. तसेच त्यांनी निवृत्तीनंतर अब्जावधी रुपये दान केले आहेत. 

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसDivorceघटस्फोट