शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 02:31 IST

सिनेटमध्ये विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात समान ५०-५० मते पडली होती. यानंतर उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी निर्णायक मत देऊन हे विधेयक मंजूर केले. हे विधेयक ९४० पानांचे असून ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठे आर्थिक पाऊल मानले जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मंगळवारी मोठा कायदेशीर विजय झाला आहे. अमेरिकन सिनेटमध्ये त्यांचे महत्त्वाकांक्षी, कर सवलत आणि सरकारी खर्चात कपात करण्यासंदर्भातील विधेयक 'वन बिग ब्युटीफुल' मंजूर झाले आहे. महत्वाचे म्हणजे, या बिलावरूनच अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्यासोबतचे संबंध ताणले गेले असतानाच ट्रम्प यांना हा विजय मिळाला आहे. तत्पूर्वी, हे विधेयक मंजूर झाले, तर आपण अमेरिकेत एक नवीन पक्ष स्थापन करू, असे मस्क यांनी म्हटले होते. यावर, ट्रम्प यांनी त्यांना अमेरिकेतून बाहेर काढण्याची धमकी दिली आहे.

जेडी वेन्स यांचे मत ठरले निर्णायक - सिनेटमध्ये विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात समान ५०-५० मते पडली होती. यानंतर उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी निर्णायक मत देऊन हे विधेयक मंजूर केले. हे विधेयक ९४० पानांचे असून ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठे आर्थिक पाऊल मानले जात आहे.

काय आहे या विधेयकात? -या विधेयकात, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात देण्यात आलेली कर कपात ४.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत (सुमारे ३७३ लाख कोटी रुपये) वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. याच बरोबर, मेडिकेड आरोग्य कार्यक्रमात १.२ ट्रिलियन डॉलर्सची (सुमारे ९९६ लाख कोटी रुपये) कपात केली जाईल. यामुळे, सुमारे १.२ कोटी गरीब आणि दिव्यांग अमेरिकन लोकांच्या आरोग्य विम्याच्या संरक्षणावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज आहे.

पुढचा टप्पा, 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज' -हे विधेयक आता अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, म्हणजेच प्रतिनिधी सभागृह ('हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज'मध्ये) जाईल. येथे काही डेमोक्रॅट्स आणि काही रिपब्लिकन खासदारांच्या विरोधामुळे आव्हान मिळू शकते. विशेषतः आरोग्यसेवा आणि अन्न सहकार्य कपातीसंदर्भात विरोध होऊ शकतो. हे विधेयक म्हणजे, ट्रम्प यांच्या अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठीच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे. 

काय म्हणाले होते मस्क? -हे विधेयक इलेक्ट्रिक वाहनांवरील कर क्रेडिट संपवणे आणि सामाजिक सेवांवरील खर्च कमी करणे यासारख्या वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. यासंदर्भात इलॉन मस्क यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, "हे विधेयक मंजूर झाले तर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांना नवीन पर्याय शोधावा लागेल," असे म्हटले होते. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिका