America Israel Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात अमेरिकन लष्कराला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. आतापर्यंत इराणने अमेरिकेचे १२ ड्रोन आणि १६ लष्करी विमाने पाडली आहेत. यामध्ये चार अन्य विमानांचाही समावेश आहे. तर एका एफ-३५ लढाऊ विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या युद्धात आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठे नुकसान झाले आहे.
अमेरिकेचे नष्ट झालेले सर्व १२ ड्रोन हे MQ-9 रीपर प्रकारचे सशस्त्र ड्रोन होते. या ड्रोनचा वापर इराण आणि पश्चिम आशियातील इतर शत्रू राष्ट्रांविरुद्ध वारंवार केला जात आहे. रीपर ड्रोन हेलफायर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून ते सलग २७ तास उड्डाण करून शत्रूच्या लक्ष्यांवर हल्ला करू शकतात. इराणच्या हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्र प्रणालीने हे १२ ड्रोन पाडले. प्रत्येक रीपर ड्रोनची किंमत अंदाजे २५० कोटी आहे. हे ड्रोन इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर आणि रिव्होल्युशनरी गार्डच्या छावण्यांवर हल्ला करण्यासाठी पाठवण्यात आले होते.
लढाऊ विमाने गमावल्यामुळे अमेरिकेला मोठे नुकसान
कुवैतच्या हवाई दलाने चुकून केलेल्या गोळीबारात तीन एफ-१५ लढाऊ विमाने पाडली. ती इराण मोहिमेवर होती. कुवैतने त्यांना शत्रू समजून त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागली. एफ-१५ हे एक जुने पण अत्यंत शक्तिशाली अमेरिकन लढाऊ विमान आहे. ते हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब वाहून नेऊ शकते. यात तिन्ही वैमानिक ठार झाले. चौथे विमान केसी-१३५ स्ट्रॅटोटँकर होते, जे हवेतच इतर विमानांना इंधन भरणारे टँकर आहे. इराकवर इंधन भरताना ते कोसळले. विमानात सहा कर्मचारी होते, त्या सर्वांचा मृत्यू झाला. केसी-१३५ हे विमान अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याशिवाय एफ-१५ आणि एफ-३५ सारखी विमाने लांब पल्ल्याच्या मोहिमा पार पाडू शकणार नाहीत.
दरम्यान, १६ विमानांच्या नुकसानीमुळे अमेरिकेचे अंदाजे ४,००० कोटींचे थेट नुकसान झाले. ड्रोनची सहजपणे दुरुस्ती करता येते, परंतु एफ-१५ आणि केसी-१३५ सारख्या विमानांना आणि त्यांच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक वर्षे लागतात. तज्ज्ञांच्या मते, जर हे युद्ध दीर्घकाळ चालले, तर अमेरिकेला आणखी विमाने आणि सैनिक गमवावे लागू शकतात.
Web Summary : Iran has reportedly downed 16 US aircraft and 12 drones, causing significant financial damage estimated at ₹4,000 crore. The losses include armed MQ-9 Reaper drones, F-15 fighter planes, and a KC-135 tanker, impacting US military capabilities.
Web Summary : रिपोर्ट के अनुसार, ईरान ने 16 अमेरिकी विमानों और 12 ड्रोन को मार गिराया, जिससे ₹4,000 करोड़ का भारी वित्तीय नुकसान हुआ। नुकसान में MQ-9 रीपर ड्रोन, F-15 लड़ाकू विमान और KC-135 टैंकर शामिल हैं, जिससे अमेरिकी सैन्य क्षमताओं पर असर पड़ा।