शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मोठा खुलासा : कोरोना किती घातक याची चिनी डॉक्टरांना आधीपासूनच कल्पना; खोटं बोलण्यासही प्रवृत्त केलं

By जयदीप दाभोळकर | Updated: January 20, 2021 09:36 IST

चीनच्या भूमिकेवर पुन्हा उपस्थित झालं प्रश्नचिन्ह

ठळक मुद्देचीनच्या भूमिकेवर पुन्हा उपस्थित झालं प्रश्नचिन्हप्रसाराबाबत रुग्णालयांनाही माहिती देण्यास करण्यात आला होता मज्जाव, डॉक्टरांचा दावा

कोरोना विषाणूनं जगभरात हाहाकार माजवला होता. कोरोना विषाणूच्या प्रसारावरून अनेकदा चीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. परंतु चीननं हे आरोप फेटाळण्याचे पुरेपूर प्रयत्न केले होते. कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास साडेनऊ कोटी लोकांना आपला जीव गमवाला लागला आहे. अमेरिका, ब्रिटन अशा ताकदवान देशांमध्येही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. तसंच आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण आला होता. परंतु चीनच्या काही डॉक्टरांनी छुप्या कॅमेऱ्यासमोर काही तथ्य मांडली आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.कोरोना विषाणू हा किती घातक आहे याची पहिल्यापासूनच कल्पना होती असं काही चिनी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितलं असल्याचा दावा ब्रिटनची न्यूज वेबसाईच मिररनं केला. कोरोना किती घातक आहे, त्याचा किती वेगानं प्रसार होऊ शकतो याची कल्पना आरोग्य कर्मचाऱ्यांना होती. परंतु त्यांना खोटं बोलण्यास सांगण्यात आलं होतं. डिसेंबर २०१९ मध्येच हा विषाणू किती भयावह असू शकतो याची कल्पना आली होती. या विषाणूमुळे लोकांचे प्राणही जात असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला जानेवारी महिन्याच्या मध्यावधीत देण्यात आली. हा विषाणू किती तेजीनं एकातून दुसऱ्या व्यक्तीत प्रवेश करतो हेदेखील रुग्णालयांना सांगण्यास मनाई केली होती, असं डॉक्टरांनी छुप्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं.कोरोना विशाणूच्या पार्श्वभूमीवर चीनमधील बिघडतं वातावरण पाहता नव्या वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु अधिकाऱ्यांनी त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. ITV वर प्रदर्शित करण्यात आलेल्या 'आउटब्रेक: द व्हायरस दॅट शूक द वर्ल्ड' या डॉक्युमेंट्रीमध्ये वुहानमधील डॉक्टरांनी सत्य मांडलं आहे. त्यांच्या सुरक्षेकडे पाहता त्यांचे चेहरे लपवण्यात आले आहेत. छुप्या कॅमेऱ्यांसमोर डॉक्टरांनी केलेल्या अनेक दाव्यांमुळे पुन्हा एकदा चीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. "डिसेंबर अखेरिस अथवा जानेवारीच्या सुरूवातीला माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. माझ्या ओळखीच्या व्यक्तीसहित त्याच्या कुटुंबातील सर्वांनाचा कोरोनाची बाधा झाली होती," अशी माहिती एका डॉक्टरनं बोलताना दिली. दरम्यान, चीननं १२ जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेला या विषाणूचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसार होत असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचा दावा केला होता. 

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना