शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Kabul Blast: काबुल विमानतळ स्फोटात मोठा खुलासा, हल्ल्याच्या सूत्रधाराचे पाकिस्तानशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 16:04 IST

Kabul Serial Blast: काबुलमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंस (IS-KP) ने घेतली आहे.

काबुल:अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात अनेकांनी आपला जीव गमावलाय. मीडिया रिपोर्टनुसार, काबुल विमानतळावरील स्फोटातील मृतांचा आकडा 100 च्या पुढे गेला असून, यात 13 अमेरिकन सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट खुरासर प्रोविंस (IS_KP) नं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून, या संघटनेच्या प्रमुखासंबंधी एक मोठा खुलासा झाला आहे.

इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंस (IS-KP) प्रमुख मावलावी अब्दुल्ला उर्फ ​​अस्लम फारुकी याच्या आदेशावरुनचा हा हल्ला करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम फारुकीचे यापूर्वी लष्कर-ए-तैयबाशी संबंध होते. यानेच हक्कानी नेटवर्कच्या साथीनं काबुल आणि जलालाबादममध्ये अनेक हल्ले घडवून आणले आहेत. फारुकीचा तहरीक-ए-तालिबानपाकिस्तानशीही संबंध असल्याची माहिती आहे.

गुरुद्वारावरील हल्ल्यात सहभाग

अस्लम फारुकी हा एक पाकिस्तानी आहे. त्याला गेल्या वर्षी एप्रिल 2020 मध्ये अफगाण नॅशनल सिक्योरिटी डायरेक्टरेट (NDS) नं नांगरहार प्रांतातून अटक केली होती. अस्लम फारुकी गेल्या वर्षी काबुलमधील गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी होता. त्या हल्ल्यात 25 जणांना जीव गमवावा लागला होता. हक्कानी नेटवर्कच्या मदतीने केलेल्या या हल्ल्यात भारतीय राजदूत निशाण्यावर होते. असलम फारुकीनं केरळचा रहिवासी असलेल्या ISIS चा दहशतवादी मुहसिन तिकरीपुरकडून आत्मघाती हल्ला घडवून आला होता. 

पाकिस्ताननं अस्लम फारुकीला वाचवण्याचा प्रयत्न केला

गेल्या वर्षी IS-KP प्रमुख अस्लम फारुकीला अटक करण्यात आली तेव्हा पाकिस्ताननं अस्लमची कोठडी मागितली होती. अस्लम फारुकीनं पाकिस्तानी एजन्सींशी असलेले संबंध उघड केले तर पाकिस्तान उघडा होईल अशी भीती पाकिस्तानला होती. पण, अफगाणिस्तान सरकारनं अस्लम फारुकीची कोठडी देण्यास नकार दिला होता. पण, काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबाननं असलम फारुकीची बगराम तुरुंगातील सुटका केली. सुटका होताच त्यानं काबुलमध्ये हे एका पाठोपाठ एक असे तीन हल्ले घडवू आणले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानterroristदहशतवादीISISइसिसPakistanपाकिस्तान