- अतुल कुलकर्णी, तेल अविवभारताची लोकसंख्या १४० कोटी. इस्रायलची स्थापना झाली तेव्हा ८ लाखावरून आज या देशाची लोकसंख्या १ कोटी १५ लाखापर्यंत गेली आहे. तंत्रज्ञानाच्या बळावर या देशाने जगात स्वतःचे स्थान निर्माण केले. या देशासोबत भारताची मैत्री आता मुक्त व्यापार करारापर्यंत येऊन थांबली आहे. त्याच्या पुढचा टप्पा म्हणून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग भारत भेटीला येत आहेत. दोन देशांचे संबंध मैत्रीच्या पलीकडे तंत्रज्ञान आणि व्यापार या दोन्ही पातळ्यांवर वाढवण्याचे प्रयत्न या दोन देशांच्या व्यापार शिखर परिषदेने साध्य केला आहे.
असे सांगत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दोन देशांचे संबंध भावनिक पातळीवर जोडण्याचे प्रयत्न केले आहेत. त्याला प्रतिसाद देताना इस्रायलचे वाणिज्य मंत्री निर बरकत यांनी देखील आपण भारताशी कौटुंबिक नाते जोडल्याचे सांगितले आहे.
१३ वर्षाचा असताना आपल्याला या देशात येण्याचे येण्याची तीव्र इच्छा होती. हा देश तेव्हापासून मला आवडत होता. अशी भावनिक मांडणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली. गोयल अत्यंत मनापासून बोलले ही भावना इस्रायली नेत्यांना सुखावणारी होती. त्याला प्रतिसाद देत या देशाचे वाणिज्यमंत्री निर बरकत यांनी देखील आपले तर भारताशी कौटुंबिक नाते जोडले आहे असे सांगून संपूर्ण कार्यक्रमाला व्यावसायिकतेपेक्षा आपुलकीची जोड दिली होती.
दोन देशांमधील कनिष्ठ मैत्रीची सुरुवात ही आजच झालेली नाही. भारत–इस्रायल संबंधांमध्ये वाढत्या घनिष्ठतेच्या पार्श्वभूमीवर इस्रायल सरकारच्या उच्चस्तरीय भेटींचा सलग क्रम कायम आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन साअर यांनी भारताचा दौरा केला होता. त्याआधी सप्टेंबर २०२५ मध्ये वित्त मंत्री बेत्झालेल स्मोत्रिच भारतात येऊन गेले होते. वाहतूक मंत्री मीरी रेगेव यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतात दौरा केला होता.
कूटनीतिक आणि धोरणात्मक सहकार्याचा वेग वाढत असताना आता पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू डिसेंबरमध्ये भारतभेटीवर येतील असे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ देखील भारतात येणार असून, त्यानंतर राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांची भेट २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात परराष्ट्र धोरण, व्यापार, संरक्षण सहकार्य, कृषी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात भारत आणि इस्रायल भागीदारीकडे जागतिक नकाशावर वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले जाईल.
Web Summary : Israeli Prime Minister Benjamin Netanyahu and President Isaac Herzog will visit India, boosting technology and trade. Minister Piyush Goyal emphasized emotional connections, mirroring sentiments from Israel's Minister Nir Barkat. High-level visits signal deepening Indo-Israeli cooperation across various sectors, including defense and agriculture.
Web Summary : इजरायली प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू और राष्ट्रपति इसहाक हर्ज़ोग भारत का दौरा करेंगे, जिससे प्रौद्योगिकी और व्यापार को बढ़ावा मिलेगा। मंत्री पीयूष गोयल ने भावनात्मक संबंधों पर जोर दिया। उच्च-स्तरीय यात्राएं रक्षा और कृषि सहित विभिन्न क्षेत्रों में भारत-इजरायल सहयोग को गहरा करने का संकेत देती हैं।