शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: इराणचा कुवेतवर थेट हल्ला! 'अल-साल्मी' जहाजाला आग, समुद्रात तेल गळतीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 08:28 IST

खाडी क्षेत्रात युद्ध तीव्र झाले असून इराणने कुवेतच्या तेलवाहू जहाजाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात जहाजाला आग लागली असून तेल गळतीचा धोका वाढला आहे.

पश्चिम आशियातील युद्धाची आग आता अधिकच भडकू लागली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता शेजारील देशांपर्यंत पोहोचला असून, इराणने कुवेतच्या 'अल-साल्मी' या महाकाय तेलवाहू जहाजाला लक्ष्य केले आहे. मंगळवारी पहाटे दुबई बंदराजवळ उभ्या असलेल्या या जहाजावर इराणने थेट हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यामुळे जहाजाला मोठी आग लागली असून, समुद्रात तेल गळती होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नेमकं काय घडलं?

कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री १२:१०च्या सुमारास ही घटना घडली. कुवेतचे 'अल-साल्मी' हे क्रूड ऑईलने भरलेले जहाज संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई पोर्टच्या एंकरेज एरियामध्ये उभे होते. यावेळी इराणच्या सैन्याने या जहाजावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात जहाजाच्या बाह्य भागाचे प्रचंड नुकसान झाले असून मोठी आग लागली. सुदैवाने, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र आर्थिक आणि पर्यावरणीय नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.

समुद्रात तेल गळतीचे संकट

जहाज तेलाने पूर्णपणे भरलेले असल्याने आग लागताच एकच खळबळ उडाली. तातडीने अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. समुद्राच्या पाण्यात कच्चे तेल पसरू नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जहाजावरील क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

इराणचा कुवेतवर राग का?

गेल्या काही दिवसांपासून इराणने केवळ इस्रायलच नव्हे, तर कुवेतलाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारीच इराणने कुवेतच्या एका जलशुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला केला होता. या हल्ल्यात दुर्दैवाने एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. या युद्धात आतापर्यंत ८ भारतीयांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, इराणने या हल्ल्याचे खापर इस्रायलवर फोडले असून, "हा आमचा हल्ला नसून आम्हाला बदनाम करण्यासाठी इस्रायलने रचलेला कट आहे," असा दावा इराणच्या सैन्याने केला आहे.

२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे युद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील या संघर्षात आता कुवेत भरडला जात आहे. या हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Attacks Kuwaiti Oil Tanker, Sparks Oil Spill Crisis!

Web Summary : Iran allegedly attacked a Kuwaiti oil tanker near Dubai, causing a fire and potential oil spill. Tensions escalate in the region, impacting oil prices. An Indian citizen died in a prior attack. Iran denies involvement, blaming Israel.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणIsraelइस्रायल