शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

गाझामध्ये मोठा धमाका! इस्त्रायली सैन्यावर हल्ला, बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:22 IST

गाझामध्ये इस्त्रायली सैन्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सात जवानांचा मृत्यू झालाय.

दक्षिणी गाझामध्ये यूनिस परिसरात हमासने इस्त्रायली सैन्यावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इस्त्रायलच्या सात जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. सर्व मृत सैनिक ६०५ व्या कॉम्बॅट इंजिनिअरिंग बटालियनचे होते. पॅलेस्टिनी संघटना हमासची लष्करी शाखा अल-कसम ब्रिगेड्सने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले

इस्त्रायल लष्कराच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. मंगळवारी दक्षिण गाझामधील खान युनूस शहरात इस्रायली चिलखती वाहनाने स्फोटक यंत्राला धडक दिल्याने सात सैनिक ठार झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लष्करी नियमांनुसार नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले की, सहा सैनिकांची ओळख जाहीर करण्यात आली आहे तर एकाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

मंगळवारी खान युनूस परिसरात झालेल्या गोळीबारात एक सैनिक गंभीर जखमी झाल्याचे लष्कराने सांगितले. हमासच्या लष्करी शाखेने, अल-कसम ब्रिगेड्सने त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर सांगितले की, त्यांनी दक्षिण गाझा पट्टीतील एका निवासी इमारतीत लपलेल्या इस्रायली सैनिकांवर हल्ला केला. 'दक्षिण खान युनूसमध्ये यासीन १०५ क्षेपणास्त्र आणि आणखी एक क्षेपणास्त्र त्यांच्यावर आदळल्याने काही सैनिक ठार झाले आणि काही जखमी झाले. त्यानंतर अल-कसमच्या सैनिकांनी मशीन गनने इमारतीला लक्ष्य केले, असं हमासने म्हटले आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करूनही इराण आणि इस्रायलचे हल्ले काही काळ सुरुच होते. यानंतर मंगळवारी दुपारी दोन्ही देश युद्धविराम करण्यासाठी तयार असल्याची घोषणा करण्यात आली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतू, आता पुढचे टेन्शन सुरु झाले आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तेथील तब्बल ४०० किलो शुद्धीकरण केलेले युरेनियम गायब झाले आहे. 

इराणच्या समृद्ध युरेनियमचा साठा असलेल्या सेंट्रीफ्युजना धक्काही लागला नसल्याचा पेंटागॉनचाच रिपोर्ट व्हायरल झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी सारवासारव करत तो खोटा रिपोर्ट असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू, आता उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनीच एबीसी न्यूजला  400 किलोग्राम युरेनियम गायब झाल्याचे कबुल केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा साठा एवढा प्रचंड आहे की त्याद्वारे १० अणुबॉम्ब तयार करता येऊ शकतात. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायल