शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चीनला मोठा झटका! तैवान १ लाख भारतीयांना नोकरी देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:36 IST

तैवान आणि भारत यांच्या मैत्रीत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे.

तैवान आणि भारत यांच्या मैत्रीत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, तैवान भारतातील सुमारे एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. हे लोक तैवानच्या फॅक्ट्री, शेतात आणि हॉस्पिटलमध्ये काम करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये या संदर्भात दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतो. हा करार झाला तर ही बाब चीनच्या पचनी पडणे कठीण होईल. अलीकडच्या काळात, चीनची अर्थव्यवस्था अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे, तर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.

तैवानमध्ये वृद्धांची संख्या सातत्यानं वाढत आहे. तेथे कामगारांची नितांत गरज आहे. दुसरीकडे, भारतात लोकसंख्येनुसार नोकऱ्या निर्माण होत नाहीत. २०२५ पर्यंत तैवान एक सुपर एज्ड सोसायटी बनेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तेथील लोकसंख्येतील वृद्धांची संख्या २० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र भारत आणि तैवान यांच्यातील करारामुळे चीनसोबतचा तणाव वाढणार हे नक्की. चीन तैवानला आपला भाग मानतो आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून तणाव आहे. तैवानशी कोणत्याही देशाचे आर्थिक संबंध असावेत असं चीनला वाटत नाही. तर दुसरीकडे चीनचा सीमेवरून भारतासोबत आधीच वाद सुरू आहे.तैवानची अर्थव्यवस्थाभारत-तैवान यांच्यातील करार अंतिम टप्प्यात असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितलं. या संदर्भात तैवानच्या कामगार मंत्रालयानं या करारावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जे आपल्याला सहकार्य करतील आणि लेबर पुरवतील त्यांचं आम्ही स्वागत करतो असं तैवानचं म्हणणं आहे. तैवानला जाऊ इच्छिणाऱ्या भारतातील लोकांचं हेल्थ सर्टिफाईड करण्याच्या यंत्रणेवर काम सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तैवानमधील बेरोजगारीचा दर २००० नंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर आहे. तैवानची अर्थव्यवस्था ७९० अब्ज डॉलर्सची आहे आणि ती टिकवण्यासाठी देशाला लेबर्सची गरज आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत