शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

भारत आणि चीनमध्ये होऊ शकते युद्ध, अमेरिकी विश्लेषकांचं निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 18:24 IST

सिक्कीममधील डोकलाममधल्या सीमेवरून सुरू असलेल्या भारत आणि चीनच्या वादाचं पर्यवसान युद्धातही होऊ शकतं, असं निरीक्षण अमेरिकेच्या विश्लेषकांनी नोंदवलं आहे.

ठळक मुद्दे चीनच्या वादाचं पर्यवसान युद्धातही होऊ शकतं, असं निरीक्षण अमेरिकेच्या विश्लेषकांनी नोंदवलं आहे.1962च्या भारत आणि चीनच्या युद्धासारखीच परिस्थिती निर्माण झाली असून, आताही तशाच प्रकारचा विरोध सुरू आहेडोकलाम हे ठिकाण चीन, भारत आणि भूतान यांच्या त्रिकोणावर स्थित आहे. तिन्ही देशांसाठी रणनीतीच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण भूभाग आहे. 

वॉशिंग्टन, दि. 27 - सिक्कीममधील डोकलाममधल्या सीमेवरून सुरू असलेल्या भारत आणि चीनच्या वादाचं पर्यवसान युद्धातही होऊ शकतं, असं निरीक्षण अमेरिकेच्या विश्लेषकांनी नोंदवलं आहे. अमेरिकी परराष्ट्र धोरण परिषद स्कॉलर जेफ एम. स्मिथशी न्यू यॉर्क टाइम्सला याची माहिती दिली आहे. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी दोन्ही देशांत युद्ध होऊ शकते, असं मत नोंदवलं आहे. स्मिथ म्हणाले, दोन्ही देश स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे परिस्थिती पूर्वीसारखं होणं अवघड आहे. 1962च्या भारत आणि चीनच्या युद्धासारखीच परिस्थिती निर्माण झाली असून, आताही तशाच प्रकारचा विरोध सुरू आहे. डोकलाम हे ठिकाण चीन, भारत आणि भूतान यांच्या त्रिकोणावर स्थित आहे. तिन्ही देशांसाठी रणनीतीच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण भूभाग आहे. भारत व चीन यांच्या सीमा ज्या डोकलाम क्षेत्रात एकत्र येतात तेथे भारतीय सेना चीनच्या सैन्यासमोर गेल्या दीड महिन्यांपासून उभी आहे. भारतीय लष्करानं चीनचे त्या क्षेत्रातील बांधकाम रोखलं आहे. चीनच्या मते तो भूभाग स्वतःच्या मालकीचा असल्यामुळे त्यात रस्ते व अन्य बांधकाम करण्याचा अधिकार आहे. भारताचा आक्षेप या प्रदेशाच्या मालकीबाबतचा जसा आहे तसाच तो चिनी बांधकाम भारताच्या उत्तर सीमेवर एक लष्करी आव्हान उभे करील, असाही आहे. चीनची आताची धमकी गंभीर आहे. आपण आपले सैन्य मोठ्या प्रमाणावर डोकलाम क्षेत्रात उतरविणार आहोत, असे त्याने भारताला सांगून टाकले आहे. तसे सांगताना ‘एकदा पर्वत हलवता येईल पण चीनचा इरादा कोणालाही विचलित करता येणार नाही’ असेही त्याने म्हटले आहे. शिवाय त्या देशाला कोणतीही पूर्वसूचना न देता प्रत्यक्ष युद्ध सुरू करण्याची सवय आहे आणि ती भारताने 1962 मध्ये अनुभवली आहे. आश्चर्य याचे की हे सारे घडत असताना याचा ज्या दोन देशांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे ते भूतान व नेपाळ हे देश त्याविषयी गप्प राहिले आहेत. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी भारताने घेतली असल्यामुळे त्यांचे हे मौन एकीकडे समजण्याजोगे पण दुसरीकडे त्यांची कृतघ्नता उघड करणारेही आहे.भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोवल हे सध्या चीनमध्ये त्या सरकारच्या अधिका-यांशी चर्चा करीत आहेत. पुढे चीनमध्येच होऊ घातलेल्या ब्रिक्स परिषदेतही या वाटाघाटी स्वतंत्रपणे चालू राहतील, असे भारताचे म्हणणे आहे. चीनचे अधिकारी मात्र त्याविषयी आपले कोणतेही मत व्यक्त करताना दिसले नाहीत. हा प्रकार आपली अगतिकता व चीनची मग्रुरी सांगणारा आहे. एवढ्या सबंध काळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याखेरीज जगातल्या एकाही राजकीय नेत्याने या स्फोटक परिस्थितीबद्दल आपले मत जाहीर केले नाही. ट्रम्प यांनीही या स्थितीत युद्ध नको, वाटाघाटी हव्या असा सल्ला भारत आणि चीन यांना दिला आहे. मात्र चीनचा हट्ट असा की भारताने त्याच्या सैन्याची पथके डोकलाममधून मागे घेतल्याशिवाय आम्ही कोणतीही चर्चा करायला तयार नाही. अशी धमकी समोर असताना सैन्य मागे घेणे आणि चीनला सारी मोकळीक देणे ही बाब भारतासाठी पराभव ठरणारी आहे. जगातला कोणताही देश अशी मानहानी सहजगत्या पत्करणारही नाही. मात्र चीनची धमकी आणि त्याने भारताच्या उत्तर सीमेवर आणलेले सैन्य लक्षात घेता हे प्रकरण फार काळ चिघळत ठेवणे हेही भारताला परवडणारे नाही. केवळ सैन्य तैनात करून चीन थांबला नाही. त्याने तिबेटच्या पर्वतक्षेत्रात रणगाडे आणण्याचेही धारिष्ट्य केले आहे. चीनची युद्धविषयक तयारी मोठी आहे. तो अण्वस्त्रसज्ज देश आहे आणि त्याचे नाविक दल पॅसिफिक महासागरापासून हिंद महासागरापर्यंत आपला प्रभाव दाखविणारे आहे. शिवाय चीनच्या हवाई दलातही लढाऊ विमानांची संख्या फार मोठी आहे. त्या देशाने पाणबुड्यांचे एक मोठे पथक तयार केले असून त्याच्या जोडीला अनेक विमानवाहू जहाजेही आणली आहेत. अंगात पहिलवानी ताकद असलेल्या एखाद्या मुजोर माणसाने शेजारच्यांना आपल्या सामर्थ्याच्या धमक्या द्याव्या तसा हा चीनचा प्रकार गुंडगिरीच्या पातळीवर जाणारा आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम उल सुंग जे करतो नेमके तेच आता चीनने भारताबाबत करायला सुरुवात केली आहे. सबंध दक्षिण आशिया हे आपले प्रभाव क्षेत्र असावे ही त्यामागची त्या देशाची महत्त्वाकांक्षा आहे. त्याच्या सुदैवाने या क्षेत्रातील पाकीस्तान, श्रीलंका व म्यानमारसह अतिपूर्वेकडील देशही त्याच्या लष्करी सामर्थ्याने धास्तावून त्याच्या प्रभावाखाली गेले आहेत. शिवाय त्याने केलेल्या प्रचंड आर्थिक मदतीच्या ओझ्याखालीही ते राहत आहेत. चीनला आजपर्यंत नमविता न आलेला दक्षिण आशियातील एकमेव देश भारत हा आहे. त्यामुळे त्याचे लक्ष भारतातील लोकशाही विस्कळीत करणे हे राहणार आहे. चीनची हुकूमशाही हा साºया जगाच्या टीकेचा विषय आहे आणि त्याचेही त्या देशाच्या राज्यकर्त्यांना वाटणारे वैषम्य मोठे आहे. अशावेळी भारताची वाटचाल खंबीर असणे व त्याचवेळी ती लवचिक असणेही त्याच्या हिताचे आहे.