काबूल : अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानी सत्ता स्थापन झाल्यानंतर महिलांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात येत आहेत. आता तालिबानी सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. हा आदेश बिगर शासकीय संस्थांसाठी (एनजीओ) असून त्यांनी महिलांना राेजगार देणे तत्काळ बंद करावे, अन्यथा संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सरकारच्या अर्थमंत्रालयाने काढलेल्या आदेशात म्हटले की, राष्ट्रीय आणि परदेशी एनजीओंनी महिलांना राेजगार देऊ नये. महिला इस्लामिक हिजाबचे याेग्य पद्धतीने पालन करत नव्हत्या. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
नेत्याचा मृत्यू; माकपचा मोर्चावायनाड : सत्ताधारी माकप कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेसचे आमदार आय. सी. बालकृष्णन यांच्या कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. देशातील सर्वांत जुन्या पक्षाच्या एका स्थानिक नेत्याच्या अलीकडील आत्महत्येच्या प्रकरणात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
खिडक्या अशा बनवा की...तालिबानने शनिवारीदेखील असाच एक आदेश दिला हाेता. त्यानुसार, महिला दिसू शकतात, अशा ठिकाणी खिडक्या बनविण्यास बंदी घालण्यात आली. यामुळे अश्लीलता पसरते, असा तर्क दिला हाेता.
महिलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या शेजाऱ्यांकडील विहीर, अंगण, स्वयंपाकघर आदी जागा दिसतील, अशा ठिकाणी खिडक्या नकाे, असे तालिबान प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने स्पष्ट केले हाेते. अशा ठिकाणी आधीपासून खिडक्या आहेत, तिथे खिडक्यांसमाेर भिंत उभारण्याचे आदेश घरमालकांना दिले आहेत.
महिलांना बंदिस्त करणारे आदेश- सहावीपेक्षा जास्त शिकू शकणार नाहीत.- बाहेर निघताना हिजाबची सक्ती.- एकटीने प्रवास करू नये.- वाहनचालक परवान्यावर बंदी.- पार्क, जिम तसेच स्वीमिंग पूलवर बंदी.- नाेकरी करू शकणार नाही.- नर्सिंगच्या प्रशिक्षणावरही बंद.- खेळण्यावर बंदी.