शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संचालकपदाचं काय घेऊन बसलात ट्विटरच विकत देता का बाेला?, तीन लाख कोटी देताे... इलॉन मस्कची सणसणीत ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 05:45 IST

जगाला कायम कोणत्या ना कोणत्या निर्णयाने आचंबित करणारे जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्क यांनी पुन्हा एक 'आश्चर्याचा बॉम्ब' टाकला.

न्यूयॉर्क :

जगाला कायम कोणत्या ना कोणत्या निर्णयाने आचंबित करणारे जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्क यांनी पुन्हा एक 'आश्चर्याचा बॉम्ब' टाकला. ज्या ट्विटरने त्यांना संचालकपदाची ऑफर देऊ केली होती, ती अख्खी कंपनीच विकत घेण्याची तगडी ऑफर इलॉन यांनी दिली आहे. 

टेस्लाचे संस्थापक असलेल्या इलॉन मस्क यांनी यासाठी सुमारे ४३ अब्ज डॉलर (३.२ लाख कोटी रुपये) मोजण्याची तयारी दर्शवली आहे. याचे वृत्त पसरताच ट्विटरच्या समभागांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्विटरने सांगितले की, इलॉन यांनी बुधवारी कंपनीचे उर्वरित शेअर्स (९.२ टक्के आधीच आहेत) खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. प्रत्येक समभागासाठी ५४.२० डॉलरची ऑफर त्यांनी दिली असून ही अंतिम ऑफर असल्याचे घोषितही केले आहे.

ट्विटर काय म्हणते?इलॉन मस्क यांनी दिलेली अनपेक्षित, बंधनकारक नसलेली ऑफर मिळाली. ती भागधारकांच्या हिताची आहे की नाही याचे मूल्यांकन करण्यात येईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.

काय म्हणाले इलाॅन मस्क?जगभरातील मुक्त अभिव्यक्तीसाठी ट्विटर हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचा माझा विश्वास आहे. यामुळे मी ट्विटरमध्ये गुंतवणूक केली. माझ्या गुंतवणुकीतून मला आता हे समजले आहे की, कंपनी तिच्या सध्याच्या स्वरूपात या सामाजिक गरजा पूर्ण करणार नाही. ट्विटरला खासगी कंपनी बनवण्याची गरज आहे. ट्विटरमध्ये विलक्षण क्षमता असून मी तिला पूर्णपणे मोकळे करेन.     - इलॉन मस्क, टेस्ला संस्थापक

८.१ कोटी फॉलोअर्स इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याची बातमी येताच ट्विटरच्या समभागांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मस्क हे ३१ जानेवारीपासून प्रत्येक दिवशी ट्विटरचे समभाग खरेदी करत आहेत. ट्विटरवर मस्क यांचे ८.१ कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ते ट्विटरवरील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहेत. 

बाजार मूल्य ३६.७ अब्ज डॉलर

ट्विटरचे प्रमुख भागधारकइलॉन मस्क- ९.२%वॅनगार्ड ग्रुप- ८.८%मॉर्गन स्टॅनली- ८.४%ब्लॅकरॉक ६.५%स्टेट स्ट्रीप कॉर्प- ४.५%जॅक डॉर्सी- २.३%

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर