पुरुषांसाठी लवकरच येणार बर्थ कंट्रोलची गोळी
By Admin | Updated: March 15, 2016 14:06 IST2016-03-15T14:06:22+5:302016-03-15T14:06:22+5:30
गर्भधारणा रोखण्यासाठी आज बाजारात महिलांसाठी अनेक गर्भरोधक साधनं उपलब्ध आहेत. त्यातुलनेत पुरुषांसाठी फार कमी पर्याय आहेत.

पुरुषांसाठी लवकरच येणार बर्थ कंट्रोलची गोळी
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १५ - गर्भधारणा रोखण्यासाठी आज बाजारात महिलांसाठी अनेक गर्भरोधक साधनं उपलब्ध आहेत. त्यातुलनेत पुरुषांसाठी फार कमी पर्याय आहेत. संशोधकांच्या प्रयत्नांमुळे लवकरच महिलांप्रमाणे पुरुषांसाठीही बाजारात बर्थ कंट्रोलच्या गोळया उपलब्ध होऊ शकतात.
टेस्टोस्टोरेनच्या वापरानं पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या बनवता येऊ शकतात, परंतु त्याच्या अतिसेवनानं वंध्यत्व येण्याचा धोका असल्याचं जिलियन कायझर या शास्त्रज्ञानं सांगितलं.
पुरुषांसाठी बर्थ कंट्रोलसाठी गोळी बाजारात आणताना अनेक चाचण्यांव्दारे ती गोळी सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. पुरुषांसाठी जी बर्थ कंट्रोलची गोळी बाजारात येणार आहे, त्यामुळे प्रजनन क्षमता आणि लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही हे सुनिश्चित करण्यावर संशोधन सुरु आहे.
काही महिलांना गर्भनिरोधक औषधं घेण्यावर बंधने असतात, अशावेळी पुरूषांना घेण्यायोग्य गोळ्या उपलब्ध झाल्या तर अनेकांसाठी ती चांगली सोय होऊ शकते. आणि सध्याच्या संशोधनाची दिशा आश्वासक असून नजीकच्या भविष्यात पुरूष घेऊ शकतिल अशा गर्भरोधक गोळ्या उपलब्ध होतील असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.