बर्लिनच्या ट्रक हल्लेखोराचा इटलीत गोळीबारात मृत्यू
By Admin | Updated: December 23, 2016 18:18 IST2016-12-23T18:18:24+5:302016-12-23T18:18:24+5:30
जापेठेवर ट्रक हल्ला करणारा संशयित शुक्रवारी पहाटे इटलीच्या मिलान शहरात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला.

बर्लिनच्या ट्रक हल्लेखोराचा इटलीत गोळीबारात मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मिलान, दि. 23 - जर्मनीच्या बर्लिन शहरात नाताळच्या बाजापेठेवर ट्रक हल्ला करणारा संशयित शुक्रवारी पहाटे इटलीच्या मिलान शहरात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. अनीस अमरी असे हल्लेखोराचे नाव असून मुळचा तो टुयूनिशयन आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास नियमित तपासणीसाठी पोलिसांनी त्याची गाडी थांबवली.
त्यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. इटली सरकारच्या मंत्र्यांनी रोम येथे पत्रकारपरिषद घेऊन ही माहिती दिली. अनीस अमरीच्या गोळीबारात एक पोलिस अधिकारी जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बर्लिनमध्ये नाताळ सणासाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून त्याने अनेकांना चिरडले. यात 12 जणांचा मृत्यू झाला. अरब स्प्रिंग म्हणजे अरब देशांमध्ये आंदोलने सुरु असताना 2011 मध्ये तो इटलीमध्ये आला होता. एका रिफ्युजी सेंटवर केलेल्या हल्ल्या प्रकरणी त्याला इटलीमध्ये तुरुंगवास झाला होता. 2015 मध्ये सुटका झाल्यानंतर त्याने तडक जर्मनी गाठली.