बर्लिनमध्ये रुग्णानं केला डॉक्टरवर गोळीबार
By Admin | Updated: July 26, 2016 18:58 IST2016-07-26T18:58:58+5:302016-07-26T18:58:58+5:30
बर्लिनमधल्या युनिव्हर्सिटी क्लिनिकमध्ये एका रुग्णानं चक्क डॉक्टरवरच गोळीबार केला आहे.

बर्लिनमध्ये रुग्णानं केला डॉक्टरवर गोळीबार
ऑनलाइन लोकमत
जर्मनी, दि. 26 - बर्लिनमधल्या युनिव्हर्सिटी क्लिनिकमध्ये एका रुग्णानं चक्क डॉक्टरवरच गोळीबार केला आहे. त्यानंतर त्यानं स्वतःलाही गोळी मारली आहे. बर्लिनच्या नैर्ऋत्य दिशेला असलेल्या विद्यापीठाच्या क्लिनिकमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असून, हा दहशतवादी हल्ला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या हल्ल्यात गोळीबार करण्यात आलेला डॉक्टर गंभीर जखमी झाला आहे. डॉक्टरला रुग्णालयात भरती करून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. उपचारादरम्यान दोन तासांनंतर डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असून, गोळीबार करण्यात आलेला परिसर बंद केला आहे. या हल्ल्यामागे दहशतवाद हे एकमेव कारण असल्याचं मत कायदे अंमलबजावणी संचलनालयानं म्हटलं आहे. रुग्णानं हा गोळीबार एकट्यानंच केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.