शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 21:13 IST

Netanyahu Speech UNGA delegation walk out: पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीत अजूनही इस्रायलचे हल्ले सुरूच

Netanyahu Speech UNGA delegation walk out : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. पॅलेस्टाईन आणि गाझापट्टीत इस्रायल सातत्याने हल्ले करत असून, त्यात अनेक निरपराध नागरिक मृत्यूमुखी पडल्याचा दावा अहवालांमध्ये करण्यात आला आहे. माणुसकीच्या नात्याने इस्रायलने युद्ध थांबवावे असे विविध देशांकडून सांगण्यात आले आहे. पण इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमासवर हल्ले थांबणार नाहीत असे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील इस्रायल सरकारवर जगातील अनेक देश नाराज आहेत. हीच नाराजी आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) दिसून आली. बेंजामिन नेतन्याहू व्यासपीठावर भाषणासाठी आले त्यावेळी अनेक देशांचे प्रतिनिधी सभात्याग करून बाहेर जाताना दिसले.

सभागृहात खुर्च्या रिकाम्या

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत जागतिक नेत्यांनी गाझा युद्धाच्या बाबतीत इस्रायलच्या भूमिकेवर आज जोरदार टीका केली. या टीकेनंतर बेंजामिन नेतन्याहू हे भाषणासाठी उठले. पण अनेक देशांचे प्रतिनिधी त्यांच्या भाषणापूर्वीच उठून निघून गेल्यामुळे महासभेचे सभागृह जवळजवळ रिकामे होते.

इस्रायली प्रतिनिधी मंडळाकडून टाळ्यांचा कडकडाट

इस्रायली प्रतिनिधी मंडळाने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह सदस्यांचे शेकडो पेजर उडवून दिल्याचे वृत्त दिले, तेव्हा त्यांना जोरदार टाळ्या मिळाल्या. सीएनएनने वृत्त दिले की या स्फोटांमध्ये काही मुलांसह किमान ३७ लोकांचा मृत्यू झाला. लेबनॉनच्या आरोग्य विभागाने सांगितले की सुमारे ३,००० लोक जखमी झाले. पण इस्रायलने याकडे वेगळ्या भूमिकेतून पाहिल्याचे सांगितले.

हमासवरील कारवाई अद्याप पूर्ण झालेली नाही !

नेतन्याहू म्हणाले की हमासची ताकद कमी झाली असली तरी ते अजूनही एक धोका आहेत. ते म्हणाले की, आमच्या नागरिकांच्या ताकदीमुळे, आमच्या सैनिकांच्या शौर्यामुळे आणि आमच्या धाडसी निर्णयांमुळे इस्रायल सर्वात काळ्या दिवसांतून बाहेर पडला आहे आणि मोठ्या लष्करी कारवायाही करू शकला आहे. परंतु हमासवरील कारवाई अद्याप पूर्ण झालेली नाही.

दरम्यान, सोमवारी नेतन्याहू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Netanyahu's UN speech prompts walkout amid Gaza war tensions.

Web Summary : Netanyahu's UN speech faced walkouts due to Gaza war policies. Criticism mounted, leading to a near-empty hall. He defended Israeli actions, stating Hamas is still a threat and operations continue. A meeting with Trump is scheduled.
टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ