जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा नोबेल शांतता पुरस्कार आपल्याचा मिळावा यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कमालीचे उतावीळ झालेले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षासह मी वर्षभरात अनेक युद्ध थांबवली, त्यामुळे यावर्षीचा नोबेल शांतता पुस्कार मला मिळायला पाहिजे अशी मागणी डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार करत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर नॉर्वेमधील नोबेल कमिटी उद्या २०२५ सालच्या नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा करणार आहे. तत्पूर्वी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा एक एआय फोटो शेअर केला असून, त्यामध्ये नेतन्याहू हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात नोबेल शांतता पुरस्काराचं पदक परिधान करताना दिसत आहेत.
नेतन्याहू यांनी शेअर केलेल्या या एआय फोटो डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही हात वर करून अभिवादनाचा स्वीकार करताना दिसत आहेत. तर नेतन्याहू हे नोबेल शांतता पुरस्काराचं पदक डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात घालताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे नोबेल शांतता पुरस्काराचे हक्कदार आहेत, असेही नेतन्याहू यांनी या फोटोसोबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
या दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे या रविवारी जेरुलेम येथे जाण्याची शक्यता आहे. इस्राइलच्या राष्ट्रपती कार्यालयाने याची माहिती दिली आहे. तर नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा होण्यापूर्वी व्हाईट हाऊसने डोनाल्ड ट्रम्प यांना दर पीस प्रेसिंडेंट ही पदवी बहाल केली आहे. तसेच नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी एक दिवस आधी इस्राइल आणि पॅलेस्टाइनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेल्या गाझा शांतता प्रस्तावाच्या एकमत झालं आहे.
Web Summary : Netanyahu shared an AI image of him awarding Trump the Nobel Peace Prize. Trump claims he deserves the award for brokering peace deals. He may visit Jerusalem soon, amid peace proposal with Hamas.
Web Summary : नेतन्याहू ने ट्रम्प को नोबेल शांति पुरस्कार देते हुए एक एआई तस्वीर साझा की। ट्रम्प का दावा है कि वह शांति समझौते कराने के कारण पुरस्कार के हकदार हैं। वह जल्द ही येरुशलम का दौरा कर सकते हैं।