शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिजबुल्लाहला नेतन्याहू घाबरले? मुलाचे लग्न स्थगित केले! दहशतवादी संघटनेच्या नव्या प्रमुखानं सांगितली इच्छा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 12:50 IST

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाह आणि इराणच्या हल्ल्याच्या भीतीने आपल्या मुलाचे लग्न स्थगित केल्याचे वृत्त आहे...

इस्रायल आणि इराण समर्थित हिजबुल्लाह यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. इस्रायल हिजबुल्लाच्या ठिकानांवर जोरदार बॉम्बिंग करत आहे. मात्र, हिजबुल्लाह देखील इस्रायलला आव्हान देत सर्व शक्तीनिशी हल्ले करत आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाह आणि इराणच्या हल्ल्याच्या भीतीने आपल्या मुलाचे लग्न स्थगित केल्याचे वृत्त आहे.

इस्रायली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बेंजामीन नेतन्याहून यांचा मुलगा अवनेर याचे लग्न 26 नोव्हेंबर रोजी उत्तर तेल अवीवमधील एका भागात होणार होते. यासंदर्भात, नेतन्याहू यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलताना म्हटले आहे की, "इस्रायल"ने छेडलेल्या बहुपक्षीय युद्धामुळे आणि विशेषतः उत्तरेकडील ड्रोनच्या धोक्यामुळे लग्नाचे आयोजन करणे धोकादायक ठरू शकते.

हिजबुल्लाहच्या नव्या प्रमुखाची इच्छा -यातच, हिजबुल्लाच्या नव्या प्रमुखाने आपली इच्छाही व्यक्त केली आहे. आपण बरेच दिवस लढू शकतो परंतु युद्धविरामासाठी तयार आहेत, असे हिजबुल्लाचा प्रमुख नइम कासिमने म्हटले आहे. बुधवारी दहशतवादी संघटनेचा प्रमुख म्हणून आपल्या पहिल्या टेलीव्हिजन भाषणादरम्यान नइम म्हणाला, हसन नसराल्लाहच्या पावलावर पाऊल ठेवत चालण्याचा आपला मानस आहे. यावेळी त्याने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कैसरिया येथील घरावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचाही उल्लेख केला आहे. तसेच, यात नेतन्याहू बचावले, कदाचित त्यांची वेळ अद्याप आलेली नाही," असेही त्याने म्हटले आहे.हिजबुल्लाहने नेतन्याहू यांच्या घरावरही केला होता हल्ला... -महत्वाचे म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला हिजबुल्लाहने ड्रोनच्या सहाय्याने नेतन्याहू यांच्या घराला निशाणा बनवले होते. यात नेतन्याहू यांच्या बेडरूमच्या खिडकीचे नुकसान झाले होते. यासाठी नेतन्याहू यांनी इराणच्या एजन्ट्सना दोषी ठरवले होते. 

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्धIranइराणIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध