शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बेंजामिन नेतान्याहूंनी रात्रीच्या अंधारात गाठले; इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे अनेक मंत्री ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:23 IST

इस्रायलच्या हल्ल्यात अनेक प्रमुख हमास नेत्यांचा मृत्यू झाला आहे.

Israel-Hamas : एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची चिन्हे आहेत, तर दुसरीकडे इस्रायल आणि गाझामध्ये सुरू असलेले युद्ध तीव्र होत आहे. आता इस्रायलने गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचे अनेक प्रमुख नेते मारले गेल्याचा दावा करण्यात येतोय. या हल्ल्यात हमास सरकारचा प्रमुख महमूद अबू वत्फा हा गृह मंत्रालयाचा महासंचालक होता. याशिवाय हमासचा राजकीय ब्युरो सदस्य अबू ओबैदा मोहम्मद अल-जमासी आणि इसाम अल-दलीस यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. हमासचा अंतर्गत सुरक्षा प्रमुख बहजत अबू सुलतान आणि न्याय मंत्रालयाचा महासंचालक अबू अमर अल-हट्टा हेदेखील या हल्ल्यांचे बळी ठरले आहेत.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायली सैन्याने गाझावरील या हल्ल्यांमध्ये 413 हून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा जीव घेतला, ज्यात मोठ्या संख्येने लहान मुलांचा समावेश आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामधील 413 मृतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत.

19 जानेवारीपासून युद्धविराम हमासने इस्रायली हल्ल्यांना 19 जानेवारीपासून सुरू झालेल्या युद्धविराम कराराचे एकतर्फी उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. हमासने एक निवेदन जारी करून म्हटले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या अतिरेकी सरकारने युद्धविराम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गाझामधील ओलीसांचे भविष्य धोक्यात येऊ शकते.

हमासने अरब आणि इस्लामिक देशांतील लोकांना, तसेच जगभरातील लोकांना रस्त्यावर उतरून निषेध करण्याचे आवाहन केले आहे. पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद (पीआयजे) सशस्त्र गटाने देखील इस्रायलवर युद्धविराम चर्चा जाणूनबुजून मोडल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलwarयुद्धBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू