घाम आल्याने 'अल्लाह' म्हटल्यामुळे मुस्लीम दाम्पत्याला विमानातून उतरविले
By Admin | Updated: August 5, 2016 18:30 IST2016-08-05T18:12:33+5:302016-08-05T18:30:55+5:30
विमान प्रवासादरम्यान घाम आल्याने अल्लाह असे म्हटल्यामुळे एका पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन दाम्पत्याला विमानातून उतरविण्यात आल्याची घटना घडली आहे.

घाम आल्याने 'अल्लाह' म्हटल्यामुळे मुस्लीम दाम्पत्याला विमानातून उतरविले
>ऑनलाइन लोकमत
शिकागो, दि. ०५ - विमान प्रवासादरम्यान घाम आल्याने अल्लाह असे म्हटल्यामुळे एका पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन दाम्पत्याला विमानातून उतरविण्यात आल्याची घटना घडली आहे.
डेल्टा एअर लाइन्सच्या विमानातून पॅरिस ते सिनसिनाटी असा प्रवास करत असताना घाम आला म्हणून अल्लाह असे म्हटले. त्यामुळे आम्हाला विमानातून इस्लामोफोबिया येथे उतरविण्यात आल्याचा दावा फैसल अली आणि त्याची पत्नी नाजिया यांनी केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी विचारणा केली असता एका क्रू मेंबरने पायलटकडे तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून फोन लपविण्याचा आणि अल्लाह असा आवाज ऐकल्याचे सांगण्यात आले.