मधमाश्याही असतात विविध व्यक्तिमत्त्वाच्या
By Admin | Updated: January 7, 2017 05:03 IST2017-01-07T05:03:56+5:302017-01-07T05:03:56+5:30
मधमाश्यांमध्येही भिन्न व्यक्तिमत्त्व आहेत, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे.

मधमाश्याही असतात विविध व्यक्तिमत्त्वाच्या
न्यू यॉर्क : मधमाश्यांमध्येही भिन्न व्यक्तिमत्त्व आहेत, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. जर्नल सायन्समध्ये याबाबत एक संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, काही मधमाश्या आपल्या सहकाऱ्यांपेक्षा काही खास काम करण्यास उत्सुक असतात. अर्थात यामागे मधमाश्यांचे भिन्न व्यक्तिमत्त्व हेच कारण आहे. इलिनोइस विश्वविद्यालयाचे कीटकशास्त्रज्ञ जीन रोबिन्सन म्हणतात की, मानव आणि पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये अद्भुतता, नवलाई ही सारख्याच प्रमाणात पाहायला मिळते.