शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी तीन तरुणींचा बॉयफ्रेंड बनला, लाखो रुपयांची लूट, बिंग फुटताच तिघींनीही पकडलं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:26 IST

Affair: अनैतिक संबंधांमुळे घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच वेळी हा तरुण तीन तरुणींशी प्रेमसंबंध ठेवून त्यांना फसवत होता.

अनैतिक संबंधांमुळे घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच वेळी हा तरुण तीन तरुणींशी प्रेमसंबंध ठेवून त्यांना फसवत होता. दरम्यान, या तिघींनीही एकत्र येत या तरुणाला असा धडा शिकवला, जो तो जीवनभर विसरणार नाही. तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून हा बदमाश त्यांच्याकडून पैसे उकळत असे. या तिघींकडून त्याने १२ लाख रुपयांहून अधिकची रक्कम उकळली होती. त्यानंतर या तीन तरुणींनी एकत्र येत या तरुणाला धडा शिकवला आणि त्याची तुरुंगात रवानगी केली. आता या बदमाशाला अडीच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.

ही घटना चीनमधील शांघाई येथे घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १० फेब्रुवारी रोजी तीन महिला शांघाईतील यांगपू जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तीन महिला पोहोचल्या होत्या. तियांनी शिवई नावाच्या एका इसमाविरोधात तक्रार दाखल केली. त्याने या तिघींकडून पैसे घेतले होते, तसेच ते परत केले नव्हते. दरम्यान, तक्रार करण्यापूव्री एक दिवस आधी या महिला एकमेकींना भेटल्या होत्या.

९ फेब्रुवारी रोजी शिवई, चेन होंग नावाच्या महिलेसोबत डिनरला गेला होता. खूप मद्यपान केल्यानंतर दोघेही चेनच्या घरी आले. तो तिथेच झोपला. चेन हिला शिवईवर आधीपासूनच संशय होता. त्यामुळे तिने त्याचा फोन तपासला. त्या फोनमध्ये इतर महिलांचेही मेसेज होते. तू फोन का उचलत नाहीस, असं त्या महिला मेसेजमधून त्याला विचारत होत्याय तेव्हा चेन हिने या महिसांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. अजून एक महिला शियाओ फान हिने सांगितले की, ती शिवईसोबत राहत होती. तो नेहमी रात्री तिच्या फ्लॅटवर येऊन झोपत असे. हे ऐकून चेनला धक्का बसला. तिचे हातपाय कापू लागले. तिला खूप राग आला. 

चेन आणि शियाओ यांना समजलं की, शिवईने या दोघांनाही लग्न करण्याबाबत वचन दिलं होतं. चेनला आणखी एक वाईट बातमी १० फेब्रुवारी रोजी सकाळी मिळाली. जेव्हा झाओ लीन नावाच्या तिसऱ्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. झाओने सांगितले की, ती सुद्धा शिवईची गर्लफ्रेंड होती. झाओचा भाऊ आणि चेन हे मित्र आहेत. त्यामुळेच झाओला चेनचा फोन नंबर मिळाला. झाओने सांगितले की, याचा अर्थ त्याच्या एकापेक्षा अधिक गर्लफ्रेंड आहेत.

जेव्हा १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी तो झोपून उठला. तेव्हा चेनने त्याची खरडपट्टी काढली. तसेच आपले पैसे परत मागितले. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. काही तासांनी या तिघींनीही पोलीस ठाण्यात जाऊन आपला जबाब नोंदवला. शिवई हा २०२१ पासून झाओला, जून २०२२ पासून शियाओला आणि ऑक्टोबर २०२२ पासून चेनला डेट करत होता. या तिघींकडून त्याने १२ लाखांहून अधिकची रक्कम लुटली. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपchinaचीन