सुंदर मुलीची दाढी गिनीज बुकात !

By Admin | Updated: September 8, 2016 22:36 IST2016-09-08T21:52:47+5:302016-09-08T22:36:29+5:30

इंग्लंडमधल्या शिख मॉडेल आणि क्रीडा प्रसारक हरनाम कौर हिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं दखल घेतली आहे

Beautiful girl's beard Guinness book! | सुंदर मुलीची दाढी गिनीज बुकात !

सुंदर मुलीची दाढी गिनीज बुकात !

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - इंग्लंडमधली शिख मॉडेल आणि क्रीडा प्रसारक हरनाम कौर हिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंद घेतली आहे. वयाच्या 24व्या वर्षी दाढी वाढवल्यानं तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या किताबानं गौरवण्यात आलं आहे. हरनाम हिची दाढी तिच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट नाही, असं तिनं सांगितलं आहे. 

ती म्हणाली, "ब-याचदा माझ्या वाढलेल्या दाढीवरून लोक माझी चेष्टा करत होते. मात्र मी कधीही त्यांच्यापुढे झुकली नाही." या परिस्थितीवर मात करत ती उत्तम मॉडेल आणि प्रतिमा संवर्धन कार्यकर्ती म्हणून नावारुपाला आली आहे. विशेष म्हणजे 24व्या वर्षीच तिची दाढी 6 इंच लांब आहे.

इंग्लंडमध्ये हरनाम कौर ही सध्या मीडियाच्या केंद्रस्थानी आहे. मार्च 2016मध्ये लंडन फॅशन वीकमध्ये वॉक करणारी ती पहिली दाढी असणारी मुलगी ठरली होती. हरनाम तिच्या या यशावर आनंदित आहे. "आता मी गर्वानं सांगू शकते की मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा किताब मिळवला आहे," अशी प्रतिक्रिया हरनाम हिनं दिली आहे.

Web Title: Beautiful girl's beard Guinness book!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.