शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

व्लादिमीर पुतिन यांना अटक केल्यास भयानक विध्वंसासाठी तयार राहा, रशियाची जगाला थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 22:23 IST

Vladimir Putin :

आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणातील वातावरण तापले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अटकेसारखी कुठलीही कारवाई झाल्यास त्यामुळे जगात भयंकर विध्वंस होईल, असा इशारा रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी दिला आहे. पुतिन यांना अटक करण्याच्या प्रयत्नांकडे रशिया युद्धाच्या घोषणेच्या रूपात पाहील, अशी ताकिद मेदवेदेव यांनी दिली आहे.

पुतिन यांना अटक केली गेल्यास रशियन शस्त्रास्त्रे युक्रेनसोबतच आंतरराष्ट्रीय कोर्टावरही हल्ला करतील, असा इशारा मेदवेदेव यांनी दिला आहे. युक्रेनमधील मुलांना डिपोर्ट केल्याच्या आरोपाखाली आयसीसीने व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे. त्याविरोधात पुतिन यांचे निकटवर्तीय असलेल्या मेदवेदेव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने एक अण्वस्त्रसंपन्न शक्ती असलेल्या देशाच्या राष्ट्रपतींवर खटला  चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही त्याचा भाग नाही आहोत. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयातील न्यायाधीशांनी एका अण्वस्त्रसंपन्न देशाविरोधात असं पाऊल उचलता कामा नये होतं, असेही ते म्हणाले.

मेदवेदेव यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सांगितले की, असं होऊ शकतं की, उत्तर समुद्रातून एक हायपरसोनिक रशियन क्षेपणास्त्र हेग स्थित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयावर आदळू शकते. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयातील न्यायाधीशांनी आता आकाशावर लक्ष ठेवावं, अशी धमकीही त्यांनी दिली. 

युक्रेनविरोधात युद्ध पुकारणे आणि युक्रेनियन मुलांना डिपोर्ट केल्याने आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे. मात्र रशियन सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना ते आयसीसीच्या कार्यकक्षेत येत नाही, असे बजावले आहे.  

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया