सावधान, येथे वाहने सावकाश चालवा!
By Admin | Updated: July 15, 2017 00:31 IST2017-07-15T00:31:45+5:302017-07-15T00:31:45+5:30
आपण पूल तर अनेक बघितले असतील. किंबहुना, ते पारही केले असतील

सावधान, येथे वाहने सावकाश चालवा!
आपण पूल तर अनेक बघितले असतील. किंबहुना, ते पारही केले असतील, पण जपानचा हा पूल बघून तुम्हाला धडकी भरली तर नवल कसले. जपानमधील या पुलाचे नाव आहे एशिमा ओहाशी. जपानमधील सर्वात मोठा आणि जगातील तिसरा सर्वात धोकादाय पूल म्हणून याची ओळख आहे.
हा पूल नाकौमी झिलच्या पुढे आहे. मॅटसू आणि सकाईमिनाटो या शहरांना हा पूल जोडतो. याची लांबी आहे १.७ किमी आणि रुंदी ११.४ मीटर. अनुभवी ड्रायव्हरही येथे जपून वाहन चालवितात. या पुलाशी संबंधित एक व्हिडीओ यू ट्यूबवर आहे. यावर वाहने चालतानचे दृश्य पाहूनच अंगाचा थरकाप उडतो. ं