शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:47 IST

इंडोनेशियामध्ये एका बोईंग विमानाचा अपघात थोडक्यात टळला. पाऊस आणि वादळी वारे वाहत असतानाच विमान उतरत होते. वाऱ्याच्या वेगामुळे विमान एका बाजूला ढकलले गेले.

Batik Air Plane Video: इंडोनेशियातील टांगेरंग शहरातील विमानतळावर एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला. विमान धावपट्टीवर उतरत असतानाचा वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे विमान डगमगले आणि घासले गेले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या बोईंग विमानाच्या अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. बतिक एअर कंपनीचे बोईंग ७३७ विमान अपघातग्रस्त होता होता राहिले. इंडोनेशियातील टांगेरंग शहरातील सोएकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. विमानाचा धावपट्टीवर उतरत असतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. 

बतिक एअर कंपनीच्या बोईंग ७३७ या विमानाला शनिवारी (२८ जून) खराब हवामानाचा फटका बसला. इंडोनेशियातील सोएकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना दुर्दैवी घटना घडता घडता टळली. 

बतिक एअर विमानाचा व्हिडीओ

विमानाचा लँडिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. पाऊस सुरू असून, दृश्यमानता कमी झालेली असल्याचे दिसत आहे. विमानाचे मागील चाके धावपट्टीला स्पर्श करतात तेव्हा ते हेलकावा खाते. त्यानंतर ते एका बाजूने झुकत जाते. विमान इतके झुकते की त्याचे इंजिन जमिनीला लागण्याची शक्यता होती. पण, पायलटने प्रसंगावधान राखल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली. 

बतिक एअर कंपनीचे प्रवक्ते दणांग मंडाला प्रीहांतोरो यांनी सांगितले की, बोईंग ७३७ विमान (क्रमांक पीके-एलडीजे) वादळी हवामान असताना उतरत होते. मात्र वेगाने वारे वाहत असल्याने त्या दाबामुळे विमान एका बाजूला ढकलले गेले. विमानाचे एक पंख धावपट्टीला लागले होते. त्यामुळे विमानात प्रचंड गोंधळ उडाला, पण वैमानिकांनी कठीण प्रसंगात धीर ढळू न देता सुरक्षितपणे उतरवले. 

या घटनेनंतर बतिक एअर कंपनीचे अभियांत्रिकी पथक विमानतळावर दाखल झाले. या विमानाची पूर्णपणे पाहणी करण्यात आली. त्यात विमानाचे मोठे नुकसान झाले नसल्याचे दिसून आले. 

टॅग्स :airplaneविमानPlane Crashविमान दुर्घटनाInternationalआंतरराष्ट्रीय