Bangladesh Violence: बांग्लादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या कथित हिंसाचार आणि हत्यांविरोधात शनिवारी(दि.27) लंडनमध्ये भारतीय व बांग्लादेशी हिंदू समुदायाने जोरदार निदर्शने केली. मात्र, लंडनमधील बांग्लादेश उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले, जेव्हा खलिस्तान समर्थक गटातील काही सदस्य बांग्लादेशच्या समर्थनार्थ तेथे दाखल झाले आणि घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
लंडनमधील आंदोलनात तणाव
निदर्शनादरम्यान खलिस्तान समर्थक गटाचे पाच सदस्य झेंडे फडकावत आणि घोषणाबाजी करताना दिसले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी शांततेत आपली भूमिका मांडत बांग्लादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसा तत्काळ थांबवावी, अशी मागणी केली.
बांग्लादेशाचे राष्ट्रगीत वाजवून निषेध
प्रदर्शनकर्त्यांनी बांग्लादेशाचे राष्ट्रगीत “आमार शोनार बांग्ला” वाजवून, देशातील धार्मिक अल्पसंख्याक, विशेषतः हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात निषेध नोंदवला. बांग्लादेशात सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत, आंतरराष्ट्रीय समुदायाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
भारतातही विविध राज्यांत आंदोलने
भारतातही बांग्लादेशातील अत्याचारांविरोधात अनेक ठिकाणी आंदोलन झाले. पश्चिम बंगाल, आसामसह विविध राज्यांत नागरिक रस्त्यावर उतरले. एएनआयच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मशाल जुलूस काढला.
भारत सरकारची तीव्र प्रतिक्रिया
भारत सरकारने बांग्लादेशात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांवरील वारंवार होणाऱ्या हिंसाचाराबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले, बांग्लादेशात अल्पसंख्याकांविरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत भारत गंभीरपणे चिंतित आहे. मयमनसिंह येथे एका हिंदू युवकाच्या हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि दोषींना शिक्षा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
Web Summary : London protests against Bangladesh violence saw Khalistan supporters clash with demonstrators. Tensions flared as they disrupted the event. Indians protested in various states, demanding action against the violence faced by minorities in Bangladesh. India expressed serious concern.
Web Summary : बांग्लादेश हिंसा के खिलाफ लंदन में विरोध प्रदर्शनों में खालिस्तान समर्थक प्रदर्शनकारियों से भिड़ गए। तनाव बढ़ गया क्योंकि उन्होंने घटना को बाधित किया। भारत में भी प्रदर्शन हुए, जिसमें बांग्लादेश में अल्पसंख्यकों के खिलाफ हिंसा पर कार्रवाई की मांग की गई। भारत ने गंभीर चिंता व्यक्त की।