बांगलादेशात चेंगराचेंगरी; २५ मृत्युमुखी, ५0 जखमी
By Admin | Updated: July 11, 2015 01:37 IST2015-07-11T01:37:56+5:302015-07-11T01:37:56+5:30
बांगलादेशातील एका व्यावसायिकाने रमजाननिमित्त आयोजित केलेल्या मोफत कपडे आणि भेटवस्तू वितरणाच्या कार्यक्रमात शुक्रवारी सकाळी भीषण
_ns.jpg)
बांगलादेशात चेंगराचेंगरी; २५ मृत्युमुखी, ५0 जखमी
ढाका : बांगलादेशातील एका व्यावसायिकाने रमजाननिमित्त आयोजित केलेल्या मोफत कपडे आणि भेटवस्तू वितरणाच्या कार्यक्रमात शुक्रवारी सकाळी भीषण चेंगराचेंगरी होऊन २५ जण मृत्युमुखी पडले, तर इतर ५० जखमी झाले. मैमनसिंग शहरात ही दुर्घटना घडली.
शेकडो लोक मोफत भेटवस्तू आणि कपडे मिळण्याच्या आशेने तंबाखू कारखान्याचे मालक शमीम तालूकदार यांच्या घराजवळ गोळा झाले होते. गर्दी वाढत जाऊन अखेरीस रेटारेटी सुरू झाली आणि तिचे पर्यवसान चेंगराचेंगरीत झाले.
‘आम्हाला घटनास्थळी २३ मृतदेह मिळाले असून जखमींना उपचारासाठी मैमनसिंग वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, असे कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रमुख करमल इस्लाम यांनी सांगितले. मृतांत २२ महिला आणि दोन बालकांचा समावेश असल्याचेही ते म्हणाले.
जकात (दान) मिळविण्यासाठी १,५०० लोक तंबाखू व्यावसायिकाच्या घरासमोर गोळा झाले होते. हा व्यावसायिक जकातच्या नावावर दरवर्षी असा देखावा करतो, असे त्याच्या शेजाऱ्याने सांगितले. टीव्हीवर प्रक्षेपित छायाचित्रांत कारखान्याच्या प्रवेशद्वारावर रक्ताने माखलेल्या चपला दिसत होत्या.(वृत्तसंस्था)