बांगलादेशमध्ये हिंदू पुजा-याची कु-हाडीने करण्यात आली हत्या
By Admin | Updated: July 1, 2016 14:51 IST2016-07-01T14:49:56+5:302016-07-01T14:51:03+5:30
बांग्लादेशमध्ये शुक्रवारी सकाळी एका हिंदू पुजा-याची कु-हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली

बांगलादेशमध्ये हिंदू पुजा-याची कु-हाडीने करण्यात आली हत्या
ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. १ - बांग्लादेशमध्ये शुक्रवारी सकाळी एका हिंदू पुजा-याची कु-हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली. बांग्लादेशची राजधानी ढाक्यापासून ३०० किमी अंतरावर असलेल्या झिनाइडा जिल्ह्यातील एका मंदिरात ही घटना घडली असून श्यामनंदो दास (वय ४५) असे मृत पुजा-याचे नाव आहे.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दास हे पूजेसाठी फुलं गोळा करत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर कु-हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दास यांचा जागीच गतप्राण झाले, अशी माहिती अधिका-यांनी दिली. मात्र हा हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नसून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही
गेल्या काही दिवसांत बांग्लादेशमध्ये हिंदूंची हत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या असून आजच्या आणखी एका हत्येमुळे परिसरातील तणाव वाढला आहे.