शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:44 IST

Bangladesh India Border Tensions: सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांच्या विधानाने बांगलादेश-भारत संबंधांमध्ये पुन्हा एकदा कटुता निर्माण झाली आहे.

Bangladesh India Border Tensions: बांगलादेशचे अंतरिम सरकार आजकाल अनेक आघाड्यांवर वेढलेले आहे. तशातच सरकारमध्ये अंतर्गत कलह देखील सुरू झाला आहे. अंतरिम सरकारचे गृह सल्लागार आणि निवृत्त लष्करी लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी यांनी एक विखारी विधान केले आहे. त्यांच्या विधानाने अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या अडचणी तर वाढल्या आहेतच, पण त्यासह भारतासोबतच्या संबंधांमध्ये पुन्हा एकदा कटुता निर्माण झाली आहे.

मंगळवारी जहांगीर आलम राजशाहीमधील तुरुंग प्रशिक्षण केंद्रात एका कार्यक्रमात पोहोचला होते. येथे पासिंग आउट परेडमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा भारत-बांगलादेश सीमेवरील अलिकडच्या तणावाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सीमेवर भारताकडून 'पुश-इन'च्या घटना खूप वाढल्या आहेत. आम्ही याचा अनेक वेळा निषेध केला आहे, जर पाठवले जाणारे लोक आमचे नागरिक असतील तर त्यांना योग्य प्रक्रियेनुसार पाठवा असे आम्ही सांगितले आहे.

'नो-मॅन्स लँड'मध्ये तणाव वाढला

भारतातील आसाम जिल्हा आणि बांगलादेशातील कुरीग्राम जिल्ह्याच्या सीमेवर परिस्थिती मंगळवारी सकाळी तापली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सीमा स्तंभ क्रमांक १०६७ जवळील बोराईबारी आणि मानकाचर भागात BSF आणि BGB आमनेसामने आले. बीएसएफ जवानांनी ९ पुरुष आणि ५ महिलांना बांगलादेशात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे, ज्याला 'पुश-इन' म्हणतात आणि याबद्दल बांगलादेशमध्ये तीव्र प्रतिक्रिया दिसून येत आहे.

सीमा पूर्णपणे सुरक्षित- सल्लागाराचा दावा

जहांगीर आलम यांनी त्यांच्या निवेदनात सीमा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले आहे की आमचे सैन्य पूर्णपणे सतर्क आहे आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. सीमेवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. अशा संवेदनशील घटनांचे वृत्तांकन करताना माध्यमांनी जबाबदारी दाखवावी असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतBSFसीमा सुरक्षा दल