शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मुले जन्माला घाला, त्यांना वाढवा... इतकेच उरले काम!, अफगाणी महिलांचा आक्रोश; तालिबानींनी शिक्षण बंद केल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 08:23 IST

महिलांनी खासगी, सरकारी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय अफगाणिस्तानचे उच्चशिक्षणमंत्री नेदा मोहम्मद नदीन यांनी २१ डिसेंबरला घेतला.

काबूल : अफगाणिस्तानातील महिलांनी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर तालिबान सरकारने बंदी घातल्यानंतर त्या उद्विग्न झाल्या आहेत. मुले जन्माला घाला व त्यांना वाढवा इतकेच काम तालिबानींनी आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे, असे संतप्त उद्गार या महिलांनी काढले. त्या देशातील महिलांचे स्वातंत्र्य तालिबान सरकारने आजवर विविध आदेशांद्वारे हिरावून घेतले आहे. 

पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेऊन अफगाणिस्तानला परतलेल्या इरम या युवतीने सांगितले की, मी भारतातून अफगाणिस्तानमध्ये परत आले. त्यावेळी तालिबान सरकार सत्तेवर आले होते. महिलांचे कोणतेही हक्क आम्ही हिरावून घेणार नाही, असे ते लोक सांगत होते; पण तालिबानी खोटारडे आहेत. त्यांनी आमचे विद्यापीठीय शिक्षण बंद केले, आम्ही मंडई, उद्यान अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकट्या जाऊ शकत नाही.

आमच्या प्रगतीचे सर्व मार्ग तालिबानींनी बंद केले आहेत. महिलांनी खासगी, सरकारी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय अफगाणिस्तानचे उच्चशिक्षणमंत्री नेदा मोहम्मद नदीन यांनी २१ डिसेंबरला घेतला. (वृत्तसंस्था)

आता व्हॉट्सॲपद्वारे शिक्षण- अफगाणिस्तानी महिलांचे शिक्षण थांबू नये म्हणून त्या देशातील सामाजिक कार्यकर्ते यांनी नवा मार्ग अंगीकारला आहे. ते या महिलांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. - काबूल विद्यापाठातील माजी प्राध्यापक हसीबुल्ला तरीन यांनी सांगितले की, मी माझ्या विद्यार्थिनींचे मोबाइलमध्ये क्रमांक सेव्ह करताना त्यांची नावे बदलली आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यामुळे मला असे करावे लागले. - मुलींनी प्रोफाइलवर फोटो लावू नयेत, अशी सूचनाही मी त्यांना दिली आहे. त्याचे पालन करून विद्यार्थिनी शिकत आहेत. 

विद्यापीठांना पत्र लिहून मांडली व्यथा नदीन यांनी संबंधित विद्यापीठांना पत्र लिहिले. महिला विशिष्ट वेशभूषेच्या निकषांचे पालन करत नाहीत, विवाहामध्ये परिधान करतात तसे कपडे त्या घालतात. त्यामुळे त्यांच्या विद्यापीठीय शिक्षणावर बंदी आणली आहे, असे उद्गार नदीन यांनी काढले होते. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान