शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी सैन्यावर २४ तासांत दुसरा हल्ला, बलूचिस्तानमध्ये बॉम्बिंग, अनेक जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:29 IST

Pakistan Army under attack: नुकत्याच झालेल्या बॉम्बहल्ल्यात काही जण ठार झाल्याचेही वृत्त

Pakistan Army under attack: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर २४ तासांत दुसऱ्यांदा हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक सैनिक जखमी झाले आहेत तर अनेक जण ठार झाल्याचेही वृत्त आहे. पाकिस्तानी सैन्यावर हा हल्ला केच प्रांतात झाला. हल्लेखोरांनी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर बॉम्बहल्ला केला. त्याआधी शुक्रवारी, बलुच सैन्याने पाकिस्तानने ओलिस ठेवलेल्या २१४ सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने म्हटले की, त्यांनी पाकिस्तानी सैन्याला कैद्यांच्या देवाणघेवाणीसाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता, पण पाकिस्तानी लष्कर आणि शाहबाज सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ओलीस ठेवण्यात आलेल्या २१४ सैनिकांना ठार करण्यात आले. त्यानंतर आज पुन्हा बलुचिस्तानमध्ये बॉम्ब हल्ला करण्यात आला.

पाकिस्तानी लष्कराच्या निवेदनात काय?

पाकिस्तानी लष्कराने काल एक निवेदन जारी करून म्हटले की, बलुचिस्तानमधील रेल्वे हल्ल्यात ठार झालेल्या २६ ओलिसांपैकी १८ जण सुरक्षा कर्मचारी होते. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, लष्कराने कारवाई सुरू करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी २६ ओलिसांना ठार मारले होते. १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त, इतर तीन सरकारी अधिकारी आणि पाच नागरिकांचाही त्यात समावेश होता.

३३ दहशतवाद्यांचा खात्मा, ३०० नागरिकांना वाचवण्यात यश

मंगळवारी BLA ने बलुचिस्तानच्या बोलन भागात ४०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर हल्ला केला होता आणि प्रवाशांना ओलीस ठेवले होते. पाकिस्तानी लष्कराने असा दावाही केला आहे की, सुरक्षा दलांनी ३३ दहशतवाद्यांचा खात्मा केला तर ३०० हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात आले. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, एकूण ३५४ ओलिसांची सुटका करण्यात आली, ज्यात ३७ जखमी प्रवाशांचा समावेश आहे.

ट्रेन 'हायजॅक' कशी झाली?

रोजच्या वेळेपत्रकाप्रमाणे, ११ मार्चला जाफर एक्सप्रेस क्वेट्टाहून पेशावरला रवाना झाली. ट्रेनमध्ये ४०० हून अधिक प्रवासी होते. ही ट्रेन बालोन टेकड्यांमधील एका बोगद्यातून जात असताना, दबा धरून बसलेल्या बलुच सैन्याच्या सैनिकांनी ट्रेन रोखली आणि हायजॅक केली. यात २१ प्रवाशांसह ५८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSoldierसैनिकBombsस्फोटकेBlastस्फोट