पाकच्या विरोधात बलुच कार्यकर्त्यांची निदर्शने

By Admin | Updated: March 13, 2017 19:29 IST2017-03-13T19:22:42+5:302017-03-13T19:29:01+5:30

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील काही बलुच कार्यकर्त्यांनी जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाबाहेर पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने केली.

Baloch Workers' Opposition Against Pakistan | पाकच्या विरोधात बलुच कार्यकर्त्यांची निदर्शने

पाकच्या विरोधात बलुच कार्यकर्त्यांची निदर्शने

ऑनलाइन लोकमत
जिनेव्हा, दि. 13 - पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील काही बलुच कार्यकर्त्यांनी जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाबाहेर पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने केली. 
पाकिस्तानकडून बलुचिस्तानमधील लोकांवर होणारा अन्याय आणि चीनच्या वाढता प्रभाव याच्याविरोधात बलुच कार्यकर्त्यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. तसेच, बलुचिस्तानमधील मानवाधिकार उल्लंघनावर देखदेख ठेवण्यासाठी एका विशेष निरिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी बलुच कार्यकर्त्यांनी केली.
बलुच कार्यकर्त्यांनी मेहरान मर्री यांच्या नेतृत्त्वाखाली ही निदर्शने केली. यावेळी मेहरान मर्री म्हणाले की, पाकिस्तानसोबत अमेरिकेने सुद्धा हात मिळविले होते. याबाबत चीनने समजून घेतले पाहिजे. पाकिस्तानसोबत दोस्ती केल्यास हाताची बोटे जळण्याचा धोका आहे.
गेल्या 4 ते 5 महिन्यात बलुचिस्तानमधील परिस्थिती भयंकर खराब झाली आहे. पाकिस्तान लष्कर आणि गुप्तहेर संघटनांकडून आमच्या मुलांसह महिलांचे अपहरण करण्यात येत आहे, असेही मेहरान मर्री यांनी सांगितले.  
 
 

Web Title: Baloch Workers' Opposition Against Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.