पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकल्यास नग्न नृत्य करण्याचं कंदील बलुचचं आश्वासन
By Admin | Updated: March 17, 2016 17:03 IST2016-03-17T16:59:03+5:302016-03-17T17:03:05+5:30
पाकिस्तानने जर वर्ल्ड कप जिंकला तर कपडे उतरवत नग्न नृत्य करण्याचं आश्वासन पाकिस्तानी मॉडेल कंदील बलुचने दिलं आहे.

पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकल्यास नग्न नृत्य करण्याचं कंदील बलुचचं आश्वासन
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 17 - पाकिस्तानने जर वर्ल्ड कप जिंकला तर कपडे उतरवत नग्न नृत्य करण्याचं आश्वासन पाकिस्तानी मॉडेल कंदील बलुचने दिलं आहे. 2011 मध्ये असंच आश्वासन पूनम पांडेनं भारतीय क्रीडरसिकांना व आपल्या चाहत्यांना दिलं होतं, जे प्रत्यक्षात आजपर्यंत उतरलेलं नाही. पाकिस्तानमधला पूनम पांडेचा अवतार मानली जाणारी कंदील पूनमच्या पावलावर पाऊल टाकत बिनधास्त विधानं करत प्रसिद्धी मिळवत असल्याचं मात्र दिसत आहे.
कंदीलनं आपल्या फेसबुक पेजवर सदर व्हिडीयो पोस्ट केला असून सोशल मीडियावर हा चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकायलाच हवं असं सांगताना शाहीद अफ्रिदीला तू सांगशील ते मी करायला तयार आहे असं आमिषही कंदीलनं दाखवलं आहे.