शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हुथींच्या समुद्री हल्ल्यांविरोधात बनवली टास्क फोर्स; सहभागी झाला 'हा' एकमेव अरब देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 15:34 IST

एका मुस्लीम देशाने उघडपणे या टास्क फोर्सला समर्थन दिले आहे

Bahrain supports naval alliance in Red Sea : अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी अलीकडेच रेड ओशन (लाल समुद्र) मध्ये जहाजांना हुथी बंडखोरांच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी बहुराष्ट्रीय टास्क फोर्स तयार करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने जाहीर केलेल्या या 'ऑपरेशन प्रोस्पेरिटी गार्डियन' ( Operation Prosperity Guardian ) बाबत अरब देशांमध्ये फारसा उत्साह नाही. अनेक अरब देशांना हल्ल्याचा धोका आहे, परंतु गाझा युद्ध पाहता या फोर्सचा फायदा इस्रायलला होईल, असे मुस्लिम देशांना वाटते. त्यामुळेच या टास्क फोर्समध्ये सहभागी होणं हे मुस्लीम राष्ट्रांबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करेल, अशी भीती मुस्लीम राष्ट्रांना आहे. पण बाहरीन हे एकमेव मुस्लीम राष्ट्र आहे ज्यांनी उघडपणे या टास्क फोर्सला समर्थन दिले आहे.

नौदलाच्या या युती दलाचा उद्देश लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. यामध्ये 20 देशांचा सहभाग आहे, त्यापैकी 12 देशांची सार्वजनिकरित्या नावे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये बाहरीन हा एकमेव अरब देश आहे. बाहरीन हा एकमेव मुस्लिम देश आहे जो स्पष्टपणे या फोर्समध्ये सामील झाला आहे. गेल्या आठवड्यातही अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी बहरीनची राजधानी मनामा येथून या दलाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. ऑपरेशन प्रोस्पेरिटी गार्डियनमधील इतर सार्वजनिक भागीदारांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, ग्रीस, इटली, नेदरलँड, नॉर्वे, सेशेल्स, यूके आणि यूएस यांचा समावेश आहे.

बाहरीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांनी अमेरिकेसोबतच्या ऐतिहासिक संबंधांचा आणि शाश्वत भागीदारीचा अभिमान व्यक्त केला, असे बाहरीनच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बाहरीनचा अमेरिकेशी चांगल्या संबंधांवर भर आहे.

टास्क फोर्स १५३ कमांड अंतर्गत हा एक महत्त्वाचा नवीन बहुराष्ट्रीय सुरक्षा उपक्रम आहे, जो लाल समुद्रातील सुरक्षेवर लक्ष केंद्रित करतो, असे यूएस संरक्षण सचिव ऑस्टिन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले हा जागतिक धोका आहे आणि युनायटेड स्टेट्सच्या नेतृत्वाखालील संयुक्त सैन्याने सागरी नेव्हिगेशन सुरक्षा वाढवणे आणि राखणे हे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व देशांसाठी नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे आणि प्रादेशिक सुरक्षा आणि समृद्धी मजबूत करणे हा त्याचा उद्देश आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाSea Routeसागरी महामार्गMuslimमुस्लीम