शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 23:51 IST

Strait of Hormuz Closed: इस्रायलच्या हल्ल्यानंतर खवळलेल्या इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणी माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

इराण आणि अमेरिकेमध्ये झालेल्या शस्त्रसंधीमुळे होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाली होती. तेल-गॅस जहाजांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच इराणने पुन्हा दणका दिला आहे. इस्रायलने लेबनानमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ बंद केल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणी सरकारी मीडियाने हे वृत्त दिले आहे. इस्रायलने लेबनानमध्ये हल्ले केल्यानंतर  होर्मुझमधून जहाज जाणे बंद झाले आहे.   होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवणे ही इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीमधील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. पण, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ बंद केली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी सलग्नित वृत्तसंस्था फार्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे. 

बुधवारी (८ एप्रिल) सकाळी इराणच्या परवानगीनंतर दोन तेल जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी पार केली. पण, त्यानंतर जहाजांची वाहतूक रोखण्यात आली आहे. इस्लामिक रिपब्लिक न्यूज वृत्तसंस्थेनेही जहाजांची वाहतूक थांबली असल्याचे वृत्त दिले आहे. इस्रायलने लेबनानमध्ये केलेल्या हल्ल्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

इराणच्या लष्कराने जहाजांना काय दिला मेसेज?

बीबीसी वृत्तसंस्थेने शिप ब्रोकर एसएसवायच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, खाडीमध्ये असलेल्या जहाजांना इराणच्या आयआरजीसीकडून मेसेज दिला गेला. 

या मेसेजमध्ये म्हटले गेले आहे की, "सर्व जहाजांनी या सूचनेकडे लक्ष द्यावे. सर्व जहाजांनी लक्ष द्यावे. फारसच्या खाडीत आणि ओमानच्या खाडीमध्ये असलेल्या सगळ्या जहाजांनी लक्ष द्या. आयआरजीसी नौदल स्टेशनमधून ही सूचना दिली जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करणे आता बंद आहे आणि होर्मुझ पार करण्यासाठी आधी आयआरजीसीची परवानगी घ्यावी लागेल. कोणत्याही जहाजे समुद्रात पुढे येण्याचा प्रयत्न केला, तर त्यावर हल्ला केला जाईल आणि नष्ट केले जाईल."

जहाजातील कर्मचाऱ्यांनी हा मेसेज रेडिओ चॅनेलवर ऐकला आहे. या रेडिओ चॅनेलचा वापर आंतरराष्ट्रीय समुद्रातील सर्तकेच्या सूचना ऐकण्यासाठी केला जातो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hormuz Strait Closed Again: Oil Tanker Traffic Halts After Iran's Warning

Web Summary : Following Israeli strikes in Lebanon, Iran has reportedly closed the Strait of Hormuz, halting oil and gas tanker traffic. This action follows a prior agreement with the U.S. to keep the strait open. The Iranian military issued a warning that any ships attempting passage without permission will be attacked.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धIsraelइस्रायलAmericaअमेरिका