प्राचीन हरिहर मूर्तीचे पळविलेले मस्तक कंबोडियाला परत
By Admin | Updated: January 22, 2016 02:51 IST2016-01-22T02:51:31+5:302016-01-22T02:51:31+5:30
विष्णू आणि शिव यांचा एकत्रित चेहरा असलेल्या देवतेचे (हरिहर) दगडी मस्तक गुरुवारी येथे मूर्तीच्या धडाला पुन्हा चिकटविण्यात आले

प्राचीन हरिहर मूर्तीचे पळविलेले मस्तक कंबोडियाला परत
नाम पेन्ह : विष्णू आणि शिव यांचा एकत्रित चेहरा असलेल्या देवतेचे (हरिहर) दगडी मस्तक गुरुवारी येथे मूर्तीच्या धडाला पुन्हा चिकटविण्यात आले. सातव्या शतकातील या मूर्तीचे मस्तक फ्रान्सकडून परत मिळाले. १३० वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी हे मस्तक पळविण्यात आले होते.
हरिहर ही मूर्ती हिंदूंच्या देवतांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या विष्णू आणि शिव यांची आहे. विष्णू हा विश्वाची निर्मिती करणारा, तर शिव त्याचा विध्वंस करणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. दक्षिण ताकेओ प्रांतातील नोम्ह दा मंदिरातून फ्रेंच संशोधकाने १८८२ किंवा १८८३ मध्ये या मूर्तीचे मस्तक चोरून नेले होते व ते फ्रान्समधील गुईमेत संग्रहालयात ठेवण्यात आले होते. (वृत्तसंस्था)