प्रियकराला मारताना मुलाचे केले धुपाटणे
By Admin | Updated: July 12, 2016 13:37 IST2016-07-12T11:47:33+5:302016-07-12T13:37:54+5:30
फ्लोरिडामध्ये एका महिलेने आपल्या पाच महिन्याच्या मुलाचा धोपाटण्यासारखा वापर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रियकराला मारताना मुलाचे केले धुपाटणे
ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. १२ - प्रियकराला मारहाण करताना फ्लोरिडामध्ये एका महिलेने आपल्या पाच महिन्याच्या मुलाचा धोपाटण्यासारखा वापर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टायाना अॅलेन (१८) असे आरोपी महिलेचे नाव आहे. अॅलेन तिच्या प्रियकरासोबत डेटोना बीचवर असताना दोघांमध्ये वाद झाला.
यावेळी संतापलेल्या अॅलेनने प्रियकराला आधी हातांनी मारहाण केली नंतर प्रियकराच्या हातातील मुल खेचून घेतले. अॅलेनने पाच महिन्यांच्या मुलाला धुपाटण्यासारखे फिरवून प्रियकरांच्या दिशेने फेकले. हे मूल वाळूत पडले. अॅलेनचा प्रियकरच या मुलाचा पिता आहे.
अॅलेन मूल आपल्याकडे खेचून घेऊन काही पावले चालत गेली. त्यावेळी मुलाचे डोके कठडयावर आपटले. पोलिसांनी अॅलेनला अटक केली असून, मुलाला रुग्णालयात दाखल केले आहे.