शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! येथे मुलींना जबरदस्तीनं केलं जात प्रेग्नंट; स्वैरपणे सुरू आहे 'बेबी फार्मिंग'! पीडितेनं सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 13:52 IST

एका पीडित तरुणीने सांगितले की, तिला कामाच्या बहाण्याने तिच्या गावातून आणले गेले. यानंतर तिच्यावर अनेकांनी बलात्कार केला. मग...

अबूजा - जगभरात अनेक बेकायदेशीर आणि अनैतिक कामे केली जातात. पण, आपण याची कल्पना तरी करू शकता का, की जगाच्या एका कोपऱ्यात चक्क 'बेबी फार्मिंग' (Baby Farming) केली जात असेल. होय, हे खरे आहे. आफ्रिका खंडातील (Africa) नायजेरियामध्ये (Nigeria) बेकायदेशीरपणे बेबी फार्मिंग केले जाते. धक्कादायक गोष्ट म्हणजे, येथे तरुणींना बळजबरीने प्रेग्नंट केले जाते आणि नंतर त्यांच्यापासून जन्माला येणाऱ्या बाळाची विक्री केली जाते. याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे, येथे बाळांना जन्माला घालण्यासाठी प्रामुख्याने अल्पवयीन मुलींना निवडले जाते.

बेबी फार्मिंगचा अवैध व्यापार -Alzajeera ने दिलेल्या एका वृत्तानुसार, नायजेरियाच्या दक्षिण-पूर्व भागात बेबी फार्मिंगचा हा अवैध धंदा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. येथे मानव तस्कर बेबी फार्मिंगसाठी एक तर तरुणींचे अपहरण करतात अथवा त्यांना नोकरी देण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात अडकवतात. 

पीडित तरुणीने ऐकवली तिची कहाणी- एका पीडित तरुणीने सांगितले की, तिला कामाच्या बहाण्याने तिच्या गावातून आणले गेले. यानंतर तिच्यावर अनेकांनी बलात्कार केला. गर्भवती राहिल्यानंतरही तिच्यावर अनेकदा बलात्कार झाला. तिला एका कमी प्रकाश असलेल्या खोलीत ठेवण्यात आले होते. तिने अनेकवेळा पळून जाण्याचाही विचार केला, पण घराबाहेर गार्डची नजर असल्याने ती पळून जाऊ शकली नाही. बलात्कार करताना संबंधित तरुणी 6 आठवड्यांची गर्भवती आहे, की 6 महिन्यांपासून, याचा त्यांना काहीही फरक पडत नही.

मेल बेबीची किंमत असते अधिक -पीडितेने सांगितले की, आमचे मूल किती रुपयांना विकले गेले, याची माहिती आम्हाला नसते. पण बाळ मुलगा असेल तर त्याची किंमत अधिक असते. एका मेल बेबी 2 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 1 लाख 48 हजार 352 रुपयांना विकले जाते. तर फिमेल बेली 1350 डॉलर म्हणजेच सुमारे 1 लाख रुपयांना विकले जाते. एका रिपोर्ट नुसार, मानव तस्करांकडून प्रामुख्याने 14 ते 17 वर्षांच्या मुलींना टारगेट केले जाते. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगWomenमहिलाSouth Africaद. आफ्रिका