एका मुलीच्या अजब लग्नाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वतः मुलीने तिची ही कहाणी शेअर केली आहे. तिने सांगितले की, ती टिंडरवर भेटलेल्या एका मुलासोबत आणि तिच्या कॉलेज मित्रासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या नात्यात वेळोवेळी काही दुरावा येत असल्याचे मुलीने सांगितले. हे प्रकरण अमेरिकेचे आहे. 26 वर्षीय एंजल बेली आणि 29 वर्षीय बॉयफ्रेंड टायलर हेस यांनी 2018 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. ते दोघे टिंडरवर भेटले. नंतर एप्रिल 2021 मध्ये दोघांनीही 23 वर्षीय सॅम विकला रिलेशनशिपमध्ये एकत्र येण्यासाठी बोलावले.बेली आणि विक त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. कॉलेजमध्ये दोन्ही मुली एकमेकांच्या जवळ आल्या होत्या. 2019 मध्ये, दोन्ही मुली एका फेस्टिव्हल साठी पुन्हा भेटल्या. त्यानंतर त्यांच्यातील आकर्षण आणखीनच वाढली. मग बेली, विक आणि टायलर रोमँटिक नात्यात एकत्र आले.या तिघांमध्ये प्रत्येकाला एकमेकांबद्दल रोमँटिक भावना येऊ लागल्या. मात्र, तिघांनाही हे नाते जपण्यात अडचणी आल्या. बेली म्हणाली – मी थोडा स्वार्थी होते. पण आता मी माझ्या मत्सरावर नियंत्रण ठेवले आहे. सुरुवातीला टायलरला कामाच्या दरम्यान त्याच्या दोन मैत्रिणींना सांभाळणे कठीण जात होते आणि बेलीला तिच्या बॉयफ्रेंडला विकसोबत पाहणे आवडत नव्हते.