शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियाची संसद पुन्हा बदनाम! महिला खासदाराने केले लैंगिक शोषणाचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 16:21 IST

सहकारी खासदार डेविड वान यांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गौप्यस्फोट थोर्पे यांनी केला होता. मात्र, त्यांना संसदेच्या नियमांमुळे भीतीने हे वक्तव्य मागे घ्यावे लागले होते.

ऑस्ट्रेलियाच्या महिला खासदाराने संसदेमध्ये तिचे लैंगिक शोषण झाल्याचा खळबळनक आरोप केला आहे. गुरुवारी अपक्ष खासदार लिडिया थोर्पे यांनी हा खुलासा केल्याने ऑस्ट्रेलियाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाची संसद महिलांसाठी कधीही सुरक्षित नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे सांगताना थोर्पे यांना अश्रू अनावर झाले होते. 

संसदेत त्यांच्यावर अश्लिल बोलले जाते. त्यांना घेरण्याचाही प्रयत्न झाला. चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले गेले. प्रभावशाली लोकांनी त्यांच्यासोबत अभद्र व्यवहार केल्याचा आरोप थोर्पे यांनी केला आहे. सहकारी खासदार डेविड वान यांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गौप्यस्फोट थोर्पे यांनी केला होता. मात्र, त्यांना संसदेच्या नियमांमुळे भीतीने हे वक्तव्य मागे घ्यावे लागले होते. गुरुवारी त्यांनी पुन्हा वान यांच्यावर हे आरोप केले आहेत. डेविड हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी या आरोपांचे खंडन केले होते. मात्र, या आरोपांनंतर पक्षाने त्यांना निलंबित केले आहे.

वान या प्रकरणी कायदेशीर तज्ञांची मते आजमावत आहेत. यामुळे त्यांना य़ा प्रकरणावर पुन्हा भाष्य करावे लागले आहे. त्यांनी अनेकदा माझा पाठलाग केला आहे. तसेच संसदेच्या आवारतच अनेकदा अश्लिल पद्धतीने स्पर्श केला आहे. यामुळे मला माझे कार्यालय सोडणे देखील भयावह वाटू लागले होते. मी ऑफिसचा दरवाजा खूप सावधतेने उघडत होते व आजुबाजुला कोणी नाही ना याची खात्री करूनच बाहेर प़डत होती. अनेकदा मला इतरांच्या मदतीने संसदेबाहेर पडावे लागले आहे, असा आरोप थोर्पे यांनी केला आहे. 

२०२१ मध्येही ऑस्ट्रेलियन संसद सेक्स कांडामुळे बदनाम झाली आहे. ब्रिटनी हिंगिस यांनी त्यांच्या मंत्र्यावर कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. ही घटना २०१९ ची होती. या प्रकरणाची पाच वेळा चौकशी झाली होती. या चौकशांमध्ये ऑस्ट्रेलियन संसदेत लैंगिक शोषण आणि त्रास देणे हे नित्याचेच झाल्याचे समोर आले होते. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाMolestationविनयभंग