शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरे हवाई सेवेने थेट मुंबईशी जोडणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 17:14 IST

मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरे थेट हवाई मार्गाने जोडल्यास उभय देशांमधील पर्यटन, व्यापार आणि संस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळेल. यादृष्टीने उभय देशांमध्ये थेट हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने संसदीय शिष्टमंडळ प्रयत्न करेल

मुंबई - मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरे थेट हवाई मार्गाने जोडल्यास उभय देशांमधील पर्यटन, व्यापार आणि संस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळेल. यादृष्टीने उभय देशांमध्ये थेट हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने संसदीय शिष्टमंडळ प्रयत्न करेल असे आश्वासन ऑस्ट्रेलियन संसदेच्या संधी व करारविषयक संयुक्त स्थायी समितीचे अध्यक्ष स्टुअर्ट रॉबर्ट यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना दिले. स्टुअर्ट रॉबर्ट यांच्या अध्यक्षतेखाली संसद सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. ऑस्ट्रेलियाने भारताशी आर्थिक सहकार्य वाढविण्याकरिता शिक्षण, कृषीव्यवसाय, पर्यटन, उर्जा, आरोग्य, पायाभूत सुविधा यांसह दहा क्षेत्रे निर्धारित केली आहेत. 

ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 24 दशलक्ष इतकी असली तरीही ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था जगात बाराव्या क्रमांकाची असून भारत हा ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा भागीदार आहे. भारतातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. जवळ जवळ 80 हजार भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियाच्या विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपैकी 7 लाख लोक मुळचे भारतीय आहेत. या पार्श्वभूमीवर उभय देशांमधील संबंध वाढविणे गरजेचे असल्याचेस्टुअर्ट रॉबर्ट यांनी सांगितले. संसदीय शिष्टमंडळाचे स्वागत करताना, महाराष्ट्र फलोत्पादनात अग्रेसर राज्य असून थेट प्रवासी विमानसेवेसोबतच थेट मालवाहू विमानसेवा सुरु झाल्यास फलोत्पादन निर्यातीस चालना मिळेल. महाराष्ट्रात पर्यटनाची अनेक वैविध्यपूर्ण स्थळे असून थेट विमानसेवेमुळे ऑस्ट्रेलियातून अधिक पर्यटक महाराष्ट्राला भेट देऊ शकतील, असेही राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितले. महाराष्ट्र आणि न्यू साउथ वेल्स या राज्यांमध्ये सामंजस्य करार असून ऑस्ट्रेलियाने महाराष्ट्राला क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सांसदीय समितीचे सदस्य मिशेल डयांबी व श्रीमती नोला मेरीनो आणि ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत टोनी ह्यूबर यांसह इतर सदस्य उपस्थित होते.   

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाMumbaiमुंबईairplaneविमान