ऑस्ट्रेलियामध्ये मोदींसमोर भारताचा नकाशा चुकीचा दाखवला

By Admin | Updated: November 14, 2014 13:38 IST2014-11-14T13:38:28+5:302014-11-14T13:38:28+5:30

ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर भारताचा चुकीचा नकाशा दाखवला गेल्याने वाद निर्माण झाला आहे.

In Australia, Modi's map showed wrong in front of India | ऑस्ट्रेलियामध्ये मोदींसमोर भारताचा नकाशा चुकीचा दाखवला

ऑस्ट्रेलियामध्ये मोदींसमोर भारताचा नकाशा चुकीचा दाखवला

>ऑनलाइन लोकमत
क्वीन्सलँड, दि. १४ -  ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर भारताचा चुकीचा नकाशा दाखवला गेल्याने वाद निर्माण झाला आहे.  क्वीन्सलँड विद्यापीठात मोदींसमोर मांडलेल्या प्रेझेंटेशनमध्ये भारताच्या नकाशातून काश्मीर वगळण्यात आला होता. आता यावर मोदी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी जी २० संमेलनासाठी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले. यानंतर मोदींनी क्वीन्सलँड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठात मोदींसमोर प्रेझेंटेशनही देण्यात आले. या प्रेझेंटेशनमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला. नकाशामध्ये काश्मीरला भारतातून वगळण्यात आले होते. यावर आयोजक आणि मोदी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title: In Australia, Modi's map showed wrong in front of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.