कॅलिफोर्नियातील एका हल्लेखोराची ओळख पटली
By Admin | Updated: December 3, 2015 14:04 IST2015-12-03T11:39:57+5:302015-12-03T14:04:25+5:30
कॅलिफोर्नियातील सॅन बॅर्नार्डिनोमध्ये अंदाधुद गोळीबार करून १४ नागरिकांना ठार मारणा-या एका संशयिताची ओळख पटली असून त्याचे नाव सय्यद फारूख असल्याचे समजते.

कॅलिफोर्नियातील एका हल्लेखोराची ओळख पटली
ऑनलाईन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. ३ - कॅलिफोर्नियातील सॅन बॅर्नार्डिनो येथील इनलॅन्ड रिजनल सेंटरच्या परिसरात अंदाधुंद गोळीबार करुन १४ नागरीकांना ठार मारणा-या एका संशयिताची ओळख पटली असून, त्याचे नाव सय्यद फारुख आहे. दरम्यान कॅलिफोर्नियातील ही चकमक आता थांबली असून दोन हल्लेखोरांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले असून त्यात एक पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. या हल्ल्यात आत्तापर्यंत १४ जण ठार झाले असून २० जण जखमी झाले आहेत.
लॉस एंजेलिसपासून ६० मैलांवर असलेल्या सॅन बॅर्नार्डिनो येथील इनलॅन्ड रिजनल सेंटरच्या परिसरात बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास तीन अज्ञात बंदुकधा-यांनी अंदाधुंद गोळीबार केला. दरम्यान संशयित सय्यद फारूख गोळीबार झालेल्या सॅनबरनारडीनोमध्ये पर्यावरण तज्ञ म्हणून काम करत असल्याची माहिती त्याच्या कागदपत्रांवरुन समोर येत आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी सूत्रांच्या आधारे हल्लेखोराचे नाव सय्यद फारुख असल्याचे सांगितले.