शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये राजकीय सभेत माेठा दहशतवादी हल्ला, ३५ ठार, २०० जखमी; चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 06:31 IST

राजकीय सभेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५ ठार, तर २०० जण गंभीर जखमी झाल्याचे पाकिस्तानी टीव्ही चॅनल ‘जिओ न्यूज’ने म्हटले आहे.

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथील बाजौरमध्ये रविवारी एका राजकीय सभेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५ ठार, तर २०० जण गंभीर जखमी झाल्याचे पाकिस्तानी टीव्ही चॅनल ‘जिओ न्यूज’ने म्हटले आहे.

सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या जमियत उलेमा इस्लाम फजल (जेयूआय-एफ) ची रॅली येथे सुरू होती. यावेळी अचानक स्फोट झाला. पोलिसांनी सांगितले की, हा दहशतवादी हल्ला असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. 

जेयूआय-एफचे  ज्येष्ठ नेते हाफिज हमदुल्ला हे या रॅलीला संबोधित करणार होते. घटनेनंतर ते म्हणाले की, या स्फोटात आमचे ३५ कार्यकर्ते ठार झाले आहेत. मी या घटनेचा निषेध करतो, अशा हल्ल्यांनी आमचे मनोबल कमी होणार नाही.

कार्यकर्त्यांमध्येच हल्लेखोरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेचारच्या सुमारास हा स्फोट झाला यावेळी रॅलीत अनेकांची उपस्थिती होती. पक्षाच्या समर्थकांमध्येच हल्लेखोर उपस्थित होते, असे मानले जात आहे. त्यामुळे हा फिदाईन हल्ला मानला जात आहे.

आणखी एक षड्यंत्रया घटनेनंतर जेयूआय-एफचे प्रमुख मौलाना फजल यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी बोलून त्यांना सविस्तर माहिती दिली. सरकारनेही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी हा हल्ला देशाला कमकुवत करण्याचे आणखी एक षड्यंत्र आहे. दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते, असे म्हटले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद