शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:32 IST

सिंध प्रांतातील जेकबाबादजवळ जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये स्फोट झाला, यामध्ये सहा डबे रुळावरून घसरले. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. काही महिन्यापूर्वी याच गाडीचे बीएलएने अपहरण केले होते.

पाकिस्तानातील सिंध प्रांतात जाफर एक्सप्रेस ट्रेनला लक्ष्य करण्यात आले. मंगळवारी जेकबाबादच्या पशु बाजाराजवळील रेल्वे ट्रॅकवर मोठा स्फोट झाला, यामुळे जाफर एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले. स्फोट होताच प्रवाशांची प्रकृती बिकट झाली. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. स्फोटानंतर लगेचच पोलिस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता याचा तपास सुरू केला आहे. हा आयईडी होता की इतर काही स्फोटक? स्थानिक प्रशासन याला दहशतवादाशी संबंधित कट मानत आहे, कारण दोन महिन्यांपूर्वी या ट्रेनवर एक भयानक हल्ला झाला होता.

दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय

११ मार्च २०२५ रोजी, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले. त्यावेळी ट्रेनमध्ये असलेल्या ४४० लोकांपैकी २१ निष्पाप नागरिक आणि ४ पाकिस्तानी सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी आधी इंजिनखाली स्फोटके ठेवून ट्रेन थांबवली, नंतर शस्त्रांनी सज्ज होऊन हल्ला केला आणि प्रवाशांना ओलीस ठेवले. 

बीएलएने आव्हान दिले होते

मे २०२५ मध्ये, बीएलएच्या मीडिया विंग 'हक्कल' ने ३५ मिनिटांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी मार्चमध्ये झालेल्या हल्ल्याला 'ऑपरेशन दारा-ए-बोलान 2.0 असे नाव दिले. व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांचे प्रशिक्षण, हल्ल्याची रणनीती आणि पाकिस्तानी सैन्याविरुद्ध हल्ल्याची योजना दाखवण्यात आली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानrailwayरेल्वे