अफगाणिस्तानात भारतीय दूतावासाजवळ हल्ला
By Admin | Updated: January 4, 2016 00:30 IST2016-01-04T00:28:06+5:302016-01-04T00:30:45+5:30
अफगाणिस्तानात मजार- ए- शरीफ शहरात भारतीय दूतावासाजवळ रविवारी रात्री उशिरा हल्ला झाला असून, यात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासाजवळ हल्ला
ऑनलाइन लोकमत
मजार- ए- शरीफ, दि.४ - अफगाणिस्तानात मजार- ए- शरीफ शहरात भारतीय दूतावासाजवळ हल्ला झाला असून, यात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या भागात आणखी दोन अतिरेकी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अफगाणिस्तान स्पेशल फोर्सने या भागाचा ताबा घेतला आहे. दरम्यान, दूतावासातील सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे विदेश मंत्रालयाने सांगितले आहे. तथापि, आम्ही अफगाणिस्तानातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून असल्याचेही भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्लेखोरांनी स्फोटके उडवून देत दूतावासाच्या परिसरात गोळीबार केला. दूतावासाच्या परिसरात गोळीबार सुरू असल्याचे एका भारतीय अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले आहे, तर सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.