शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात अजून एका हिंदू मंदिरावर हल्ला, मूर्तीची केली विटंबना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 10:24 IST

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात.

ठळक मुद्देपाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका हिंदू मंदिरावर जमावाने हल्ला करून मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची घटना थारपरकारमधील चाचरो येथे जमावाने माता राणी भातियानी मंदिरातील पवित्र मूर्ती आणि ग्रंथांची विटंबना केली आहे

इस्लामाबाद -  पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. दरम्यान, पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका हिंदूमंदिरावर जमावाने हल्ला करून मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये ननकाना साहिब गुरुद्वारावर दगडफेक झाली होती. तसेच सप्टेंबर महिन्यात सिंध प्रांतामध्ये एका हिंदू मंदिरावर हल्ला करून कट्टरपंथीयांनी मोडतोड केली होती. या संबंधीची छायाचित्रे पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटरवर शेअर केली आहेत. ''सिंध प्रांतात अजून एका हिंदू मंदिराची मोडतोड करण्यात आली आहे. थारपरकारमधील चाचरो येथे जमावाने माता राणी भातियानी मंदिरातील पवित्र मूर्ती आणि ग्रंथांची विटंबना केली आहे, अशी माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.  पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. अशा घटनांबाबतचे वृत्त नेहमी वृत्तपत्रांमधून प्रकाशित होत असते. दरम्यान सिंधू प्रंतामध्ये हिंदू तरुणींचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आल्याच्या काही घटनासुद्धा घडल्या आहेत. 

एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे काश्मीरमधील अल्पसंख्यांकाचा प्रश्नावरून कायम भारतावर टीका करत असतात. मात्र त्यांच्या स्वत:च्या देशात मात्र अल्पसंख्याकांच्या हितांचे रक्षण करणे त्यांना शक्य झालेले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिखांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या ननकाना साहीब येथेही दगडफेक झाली होती. त्याविरोधात भारतासह जगभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूTempleमंदिर