भारतीय दूतावासावर अफगाणमध्ये हल्ला
By Admin | Updated: March 3, 2016 05:00 IST2016-03-03T05:00:49+5:302016-03-03T05:00:49+5:30
आत्मघाती हल्लखोरांनी बुधवारी दुपारी स्फोटकांनी स्वत:ला उडवून देत अफगाणिस्तानमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला केला. सुदैवाने सर्व भारतीय सुखरूप असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

भारतीय दूतावासावर अफगाणमध्ये हल्ला
जलालाबाद : आत्मघाती हल्लखोरांनी बुधवारी दुपारी स्फोटकांनी स्वत:ला उडवून देत अफगाणिस्तानमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला केला. सुदैवाने सर्व भारतीय सुखरूप असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. या दहशतवादी हल्ल्यात एक स्थानिक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. दूतावास संकुलनात संशयास्पद हालचालीसोबत गोळीबार झाल्याचे दिसताच भारत-तिबेट सीमा सुरक्षा पोलिसांनी उलट गोळीबार केला. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने प्रतिहल्ला चढवीत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.